पनीर मोमोज (paneer momos recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#मोमोज #सप्टेंबर
मी मोमोज जास्त केलेले नाहीत ही रेसिपी मला माझ्या ताईनी दिलेली आहे त्याप्रमाणे मी केली आहे.

पनीर मोमोज (paneer momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर
मी मोमोज जास्त केलेले नाहीत ही रेसिपी मला माझ्या ताईनी दिलेली आहे त्याप्रमाणे मी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपकिसलेले पनीर
  2. 1 कपकिसलेला कोबी
  3. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  4. 1/2 कपकिसलेले गाजर
  5. 1 टीस्पूनबटर
  6. 1 टेबलस्पूनकिसलेले आले
  7. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला लसूण
  8. 1 टीस्पूनमिरपूड
  9. 1 टीस्पूनअजिनोमोटो
  10. 2 कपमैदा
  11. 1 टेबलस्पूनमीठ
  12. 1/2 कपपाणी
  13. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    परातीमध्ये मैदा आणि 1/2 टेबलस्पून मीठ एकत्र करून घ्यावे आणि हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्यावे त्यानंतर 15-20 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे.

  2. 2

    भाज्या स्वच्छ धुवून घ्या आणि किसून घ्या (मी सर्व भाज्या फूडप्रोसेसरमध्ये बारीक केल्या आहेत) बारीक केलेल्या भाज्या एका भांड्यात काढून घेतल्या त्यात मीठ, मिरपूड आणि अजिनोमोटो घालून एकत्र केले आणि 5 मिनिटे ठेवले तोपर्यंत पनीर हाताने कुस्करून घेतलं आता भाज्याना पाणी सुटले असेल ते पाणी पिळून काढा जास्त प्रमाणात पिळू नये नाहीतर मोमोज खूप कोरडे होतात आता याच्यात कुस्करलेले पनीर आणि बटर घातले आणि हाताने एकदा मिक्स करून घेतले.

  3. 3

    फ्रीजमधून मैदा बाहेर काढून घ्या आणि त्याच्या छोटे-छोटे गोळे करून घ्या हे गोळे थोडा थोडा मैदा घालून गोल आकारात पातळ लाटून घ्यावे आणि मध्ये सारण घालून करंजीप्रमाणे बंद करून घ्यावे करंजीचे दोन्ही कॉर्नर धरून पुन्हा जॉईन करावे.

  4. 4

    स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवावे आणि स्टीमर प्लेटला तेलाचा हात लावून तयार मोमोज थोड्या थोड्या अंतरावर ठेवून वीस मिनिटे वाफवून घ्यावेत.

  5. 5

    गॅस बंद करुन गरमागरम मोमोस सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes