रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी

रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
4-5 व्यक्तींसाठी
  1. 100 ग्रॅमरवा
  2. 100 ग्रॅममिल्क पावडर
  3. 70 ग्रॅमसाखर
  4. 1.5 कप दूध
  5. 50 ग्रॅमकॅडबरी चॉकलेट
  6. 3 टेबलस्पून काजू, बदाम, पिस्त्याचे काप
  7. 50 ग्रॅमतूप

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम एका कढईमध्ये तूप घेऊ.नंतर त्यात आपण रवा टाकून मंद आचेवर भाजून घेऊ. रवा सोनेरी रंगाचा झाल्यावर त्यात आपण साखर आणि मिल्क पावडर घालून मिक्स करून घेऊ.

  2. 2

    आता आपण यात कॅडबरी चॉकलेट आणि दूध घालून मिश्रण छान पैकी मिक्स करून घेऊ. आणि मंद आचेवर पाच सहा मिनिटे शिजवू द्या. आता त्यात काजू बदाम पिस्त्याचे काप टाकून हलवून घेऊ.

  3. 3

    प्लेटला आपण तुपाचा हात लावून घेऊ.मिश्रण कढाई ला सुटू लागल्यावर प्लेटमध्ये काढून वाटीचे साह्याने थोपवुन घेऊ. त्यावर काजू,बदाम,पिस्त्याचे काप पसरून घेउ. थंड होण्यासाठी बाजूला ठेवू.

  4. 4

    आता सुरीच्या मदतीने त्याच्या चौकोनी बर्फी पाडून घेऊ तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कापून घेऊ शकता. झटपट बनणारी आणि खायला खूप टेस्टी अशी ही बर्फी नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

Similar Recipes