पमकीन बर्फी (pumpkin barfi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#रेसिपीबुक #week14 बर्फी या थीम साठी लाल भोपळ्याची बर्फी बनवली.

पमकीन बर्फी (pumpkin barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14 बर्फी या थीम साठी लाल भोपळ्याची बर्फी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनीटे
३-४ सर्विंग
  1. 1/2 कपशिजवलेला लाल भोपळा
  2. 1/4 कपदूध
  3. 1 टेबलस्पूनसाजुक तूप
  4. 1/4 कपमिल्कमेड
  5. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  6. 1/4 टीस्पूनवेलचीपूड
  7. 1 टीस्पूनभोपळ्याच्या बिया...सजावटीसाठी

कुकिंग सूचना

१५-२० मिनीटे
  1. 1

    भोपळा किसून किंवा तुकडे करून वाफवून घेतला. पॅन मध्ये तूप घालुन मंद आचेवर भोपळा परतून घेतला.

  2. 2

    त्यात दूध घालून छान परतला.मग त्यात मिल्कमेड आणि मिल्क पावडर घालून आटवले. त्यात वेलची पूड घालून नीट मिक्स केले. मी ह्यात साखर किंवा गुळ वापरले नाही कारण भोपळ्याचा, मिल्कमेडचा आणि मिल्क पावडर,दूध ह्या सगळ्यांचा गोडवा पुरेसा वाटला.

  3. 3

    पॅन पासून मिश्रण सुटू लागले, एक गोळा तयार होऊ लागला की गॅस बंद केला.

  4. 4

    एका ताटलीला तुपाने ग्रीस करून त्यात मिश्रण थापले.त्यावर भोपळ्याच्या बिया पसरवल्या..मिश्रण सेट होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवले.

  5. 5

    मिश्रण गार झाल्यावर छान तुकडे कापून घेतले.पमकिन बर्फी खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes