उपवास एप्पल जिलेबी (upwasachi apple jalebi recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week15
#चकली आणी जिलेबी

आपल्याला जिलेबी म्हटले की काही निवडक जिलेबी डोळ्या समोर येतात. आत्ता काही माझ्या मैत्रिणी ज्यांना माझ्या सारखीच काहितरी वेगळे करायचे असते त्या मग जोमानी कामाला लागतात आणी आपल्या पाक कौशल्यातून काही तरी नवीन घेउन येतात. तसेच आज मी ही माझे पाक कौशल्य वापरून ही एक नवीन जिलेबी ची रेसिपी घेउन आली.. नक्की करुन पहा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4-5 जण
  1. 2सफरचंद
  2. 3 टेबलस्पूनशिन्घाडा पीठ
  3. 1/4 टीस्पूनजिलेबी चा खायचा रंग
  4. 1चिमटी मीठ
  5. 125 ग्रॅमसाखर
  6. 130 ग्रॅमपाणी
  7. 1 टीस्पूनवेलची पूड
  8. 1 टीस्पूनपिस्ता सजावटी साठी
  9. 100 ग्रॅमसाजुक तुप तळण्या साठी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम सफरचंदाची साल काढुन बारिक चिरून घ्या व मिक्सर मधे छान बारिक करुन घ्या व हे मिश्रण एका बाउल मधे काढा

  2. 2

    आत्ता गैस वर एका पातेल्या मधे साखर व पाणी घालून एक तरी पाक करायला ठेवा त्या मधे वेलची पुड घाला. आत्ता सफरचंदाचा जो गर आहे त्या मधे शिंगाड्या च पीठ रंग व मीठ घालुन एकजीव करा व पायपिंग बैग मधे भरून घ्या.

  3. 3

    आत्ता गैस वर तुप गरम करण्यास ठेवा व पायपिंग बैग च्या मदतिनी तुपा मधे गोल गोल जिलेबी काढा व दोन्ही कडून सोनेरी रंग येई पर्यंत तळून काढावेत व लगेच तैयार केलेया एक तारी पाकात घाला.

  4. 4

    व दोन मिनिटांनी पाकातल्या जिलेबी काढुन निथळत ठेवा तशया ह्या जिलेबी नरमच असतात जास्त वेळ पाकात नका ठेऊ. आत्ता आपल्या उपवास एप्पल जिलेबी तैयार आहेत तुम्ही ह्या तश्याच किंवा रब्डी बरोबर सर्व्ह करु शकता..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes