डोनट (donut recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#डोनट#सप्टेंबर
एक सुंदर सजवलेला गोड पध्दार्थ ज्याला पाहूनच स्वत: ला थांबवणे अवघड होते..
तसे हे डोनट्स डच खाद्य संस्कृतीतील,तो त्यांनी अमेरिकेला दिला नंतर त्यात आपापल्या आवडी ने चवीने आणखी सुधारणा झाली अणि आज त्याने सर्व जग व्यापून घेतले.
चॉकलेट माझा सगळ्यात मोठ्ठा वीक पॉईंट अणि ते जर डोनट वर केलेले नक्षी काम असो किंवा शुगर स्प्रिंक्लर्स नी सजवलेले असो मी तर म्हणेन की डोनटस् पाहून कोणी ही स्वत: ला हे वाक्य म्हटल्या शिवाय थांबू नाही शकत.... "MAD OVER DONUTS"

डोनट (donut recipe in marathi)

#डोनट#सप्टेंबर
एक सुंदर सजवलेला गोड पध्दार्थ ज्याला पाहूनच स्वत: ला थांबवणे अवघड होते..
तसे हे डोनट्स डच खाद्य संस्कृतीतील,तो त्यांनी अमेरिकेला दिला नंतर त्यात आपापल्या आवडी ने चवीने आणखी सुधारणा झाली अणि आज त्याने सर्व जग व्यापून घेतले.
चॉकलेट माझा सगळ्यात मोठ्ठा वीक पॉईंट अणि ते जर डोनट वर केलेले नक्षी काम असो किंवा शुगर स्प्रिंक्लर्स नी सजवलेले असो मी तर म्हणेन की डोनटस् पाहून कोणी ही स्वत: ला हे वाक्य म्हटल्या शिवाय थांबू नाही शकत.... "MAD OVER DONUTS"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 15-20 मिनिट
13-15 नग
  1. 200 ग्रॅममैदा
  2. 1/4 कपकोमट दुध
  3. 3 टेबलस्पूनसाखर
  4. 2 टीस्पूनयीस्ट
  5. 2चिमटी मीठ
  6. 1आणि 1/2 टेबलस्पूनबटर
  7. 3बार व्हाईट चॉकलेट
  8. 100 ग्रॅमडार्क चॉकलेट
  9. 3 टेबलस्पूनशुगर स्प्रिंकलर्स सजावटीसाठी
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1 तास 15-20 मिनिट
  1. 1

    प्रथम कोमट दुधामधे साखर विरघळून घ्या व यीस्ट घालुन पुन्हा मिक्स करा व झाकण ठेऊन पंधरा मिनिटे बाजुला ठेवा(धक्का नाही लागला पाहिजे)

  2. 2

    पंधरा मिनिटांनी यीस्ट फर्मंट झाले की एककी कडे मैद्या मधे मिठ घाला व यीस्ट च मिश्रण घाला व हलके मिक्स करा आत्ता लागेल तसे पाणी घाला मला 1/4 कप पाणी लागलथोदा गोळा चिक्कट येतो पण नंतर त्ततो गोळा किचन ओट्यावर घ्या व बटर घालुन छान पाच ते सात मिनिट मळा जो पर्यंत मैद्याचा गोळा एकजीव होत नाही तोपर्यंत फोटोत दखवले आहे आता त्या गोळ्याला काचेच्या मोठ्या भांड्यात तेल लाऊन झाकुन ठेवा किमान 45 मिनिट धक्का नका लागू देऊ.

  3. 3

    45 मिनिट नंतर असे छान फर्मंट होऊन येते पुन्हा ह्या गोळ्याला पाच ते सात मिनिट मळा. आत्ता ह्या अख्ख्या गोळ्याची एक सेंटीमीटर जाडी ची पोळी लाटा व डोनट कटर नी आकार द्या (किंवा तुम्हाला जसे आकार द्यायचा असेल तसे) व एका प्लेट मधे पंधरा मिनिटांसाठी कपडानी झाकुन ठेवा. तो पर्यंत गैस वर कढईत तेल स्लो आचेवर गरम करण्यास ठेवा.

  4. 4

    पंधरा मिनिटांनी प्लेट मधिल डोनट फुलून येतिल आत्ता त्यांना हात न लावता उलथण (सराटा) च्या साह्यानी तेलात सोडा व गोल्डन ब्राउन होई पर्यंत तळून काढावेत असे सगळेच करुन घ्या.

  5. 5

    डबल बोइलर किंवा माइक्रोवेव मधे दोन्ही चॉकलेट वितळून घ्या (मी इथे डार्क चॉकलेट मधे किंचीत बटर घालुन डायरेक्ट गैस वर वितळून घेतलेय अणि व्हाईट चॉकलेट माइक्रोवेव मधे) आत्ता डोनट्स एक एक करुन तुम्हाला आवडेल तसे चॉकलेट मधे डिप करुन रेकवर ठेवा म्हणजे जातीचे चॉकलेट निथळून जाईल. आत्ता तुम्हाला आवडेल तसे शुगर स्प्रिंक्लेर्स नी सजवा.

  6. 6

    काही मिनीट साठी हे डोनट्स फ़्रीज़ मधे ठेवा व आयत्या वेळेस थंड किंवा हलके कोमट करुन सर्व्ह करावे त्याची आकर्षक सजावट पाहूनच खाणारे स्वात: ला थांबवू शकणार नाही...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes