बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक #Week12

खुप दिवसांनी बाकरवडी करण्याचा योग आला..
कूक पॅड मुळे खूप काही शिकायला मिळते आहे,
बाकरवडी नाश्त्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि स्पेशली मॉर्निंग च्या चहा कॉफी सोबत एकदम छान आहे...
बाकरवडी केल्यावर मुलांनी पटकन गरम-गरम संपली पण,,
इतकी छान हि बाकरवडी झाली...
चला तर करुया बाकरवडी...🤩

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week12

खुप दिवसांनी बाकरवडी करण्याचा योग आला..
कूक पॅड मुळे खूप काही शिकायला मिळते आहे,
बाकरवडी नाश्त्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि स्पेशली मॉर्निंग च्या चहा कॉफी सोबत एकदम छान आहे...
बाकरवडी केल्यावर मुलांनी पटकन गरम-गरम संपली पण,,
इतकी छान हि बाकरवडी झाली...
चला तर करुया बाकरवडी...🤩

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
15 सर्व्हिंग्ज
  1. बाकरवडी ची पोळी करण्यासाठी
  2. 1.1/2कप मैदा
  3. 4 टेबलस्पूनबेसन
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. आवश्यकतेनुसार पाणी
  7. बाकरवडी चा आतला मसाला
  8. 1/2 कपखोबरं
  9. 2 टेबलस्पूनकाळे तीळ
  10. 1 टेबलस्पूनबडीशोप
  11. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनधने पावडर
  14. 1 टीस्पूनजिरे
  15. 2 टीस्पूनआमचुर पावडर
  16. 1 टेबलस्पूनसाखर
  17. 1 टेबलस्पूनचिंचेची चटणी
  18. तळण्यासाठी तेल
  19. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    सर्व साहित्य काढून ठेवायचे, बेसन, मैदा,तेल,मीठ, हळद एकत्र करून घ्यायचे, पाणी घालून त्याला भिजवायचे त्याचा उंडा तयार करून पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवावे..

  2. 2

    मिक्सर वर सर्व सुखे मसाले घालून बारीक करून घ्यावे. मैदा आणि बेसन ची व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची

  3. 3

    त्यावर मिक्सरमधून बारीक केलेलं सारण पसरवावे, कडेला पाण्याचा हात लावून पोळीची गुंडाळी करून गोल गोल फिरवून घडी करून घेणे, त्याचे काप करून घ्यायचे,

  4. 4

    जे काप आपण कापलेले त्याला हलकं दाबून घ्यावे, आणि तेलामध्ये मंद आचेवर खरपूस तळून घेणे,

  5. 5

    आता आपली बाकरवडी तयार आहे... छान गरम गरम खूप जास्त टेस्टी हि बाकरवडी चवीला लागते,, माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडली आणि पटापट संपली पण...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes