जिलबी (jalebi recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक #week15

#चकलीआणिजिलबी रेसिपीpost2

रेसिपी बुक ची सुरुवात जशी गोडाच्या पदार्थ ने झाली तसेच रेसिपी बुक चा शेवटचा पदार्थ देखील गोड पदार्थ ने करुया म्हणूनच गरम गरम साजूक तूपातील जिलबी म्हणजे बहुतेक सर्वांच्या आवडीची.आता ह्याच जिलबी वर मस्त रबडी घालून खाण्याचा ट्रेंड सध्या आहे.जिलबी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पनीर जिलबी,रव्याची जिलबी वगेरे

आज आपण पटकन झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत.एकदा तुम्ही घरी जिलबी तयार केली की बघता बघता कधी फस्त होईल कळणार पण नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 1 कपमैदा
  2. १/४ कप आंबट दही
  3. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1/4 टीस्पूनकेशर पिवळा रंग
  5. तळण्यासाठी तूप
  6. पाक तयार करण्यासाठी
  7. 4 कपसाखर
  8. 2 कपपाणी
  9. 1/2लिंबाचा रस
  10. ८-१० केशर काड्या

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    पाक तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये साखर व पाणी घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस घाला म्हणजे साखरे चे क्रिस्टलाईझ होणार नाही.आता त्यात केशर काड्या घालून एकतारी पेक्षा थोडा कमी असा पाक तयार करुन घ्या.

  2. 2

    एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यात दही व बेकिंग पावडर घाला.आता केशरी पिवळि रंग घालून त्यात थोडे थोडे पाणी घालून थोडी फ्लोईंग कन्सिस्टन्सी होईल असे पीठ भिजवून घ्या.(जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करुन नये.)

  3. 3

    आता पायपींग बॅग मध्ये तयार केलेले मिश्रण भरुन घ्या.कढ‌ईत तूप गरम करून त्यात जिलब्या पाडाव्या व मध्यम आचेवर कुरकुरीत जिलबी तळून घ्या

  4. 4

    तळून घेतलेली जिलेबी आता तयार केलेल्या पाकात घाला.५-७ मिनिटांनी जिलबी पाकातून बाहेर काढून घ्यावी.सर्वजिलब्या तयार करुन घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes