डिस्को पराठा सैंडविच (paratha sandwich recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4#week3
मी golden apron मधिल सैंडविच हा क्लु घेउन ही रेसिपी केली आहे..
कोण म्हणते सैंडविच हे ब्रेड च्च बनते. काही तरी हैल्दी करायचे बस इतकेच विचार सुर होते आज वन पॉट मिल करायचे होते मग पराठे करायला घेतले अणि अचानक मुलगी लहान असतांना तिला मी छोटे छोटे वाटी नी आकार दिलेले पराठे करायची मग काय लगेच ही मिनी पराठा सैंडविच रेसिपी उदयास आली मिनी म्हणण्या पेक्षा डिस्को हे जास्त छान वाट्टे... एकदम करायला सोप्पी अशी ही रेसिपी.. काहीही घाट नाही सगळे जिन्नस जवळपास घरचीच... चला तर लागा ही रेसिपी करायला...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 जण
  1. 125 ग्रॅमपालक
  2. 1 छोटाउकडलेला बटाटा
  3. 150 ग्रॅमकणिक
  4. 50 ग्रॅमज्वारी च पीठ
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1 टीस्पूनतिळ
  7. 1 टीस्पूनधणे -जीरे पुड
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1 टेबलस्पूनमायोनेझ
  13. 1/4 टीस्पूनमिरे पूड़
  14. 1किसलेले गाजर
  15. 1किसलेली काकडी
  16. 2 टेबलस्पूनमूग स्प्राउट्स
  17. 1कांदा बारिक चिरलेला
  18. 1चीज क्यूब
  19. 2 टेबलस्पूनशेजवान चटनी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम पालकाची पेस्ट करुन घ्या, आता कणिक अणि ज्वारी च पीठ एकत्र करा त्या मधे पालक पेस्ट बटाटा कुस्करून व बाकी मसाले जसे तिखट मीठ जीरे पुड धणे पूड हळद हिँग घालुन पोळी साठी मळतो तसा गोळा मळुन घ्या.

  2. 2

    आत्ता त्यगोळ्या ची पोळी लाटून वाटी नी छोटे छोटे गोल करुन घ्या व पराठा शेक्तो तसे शेकून घ्या.आत्ता एका बाउल मधे मेयॉनीस घेउन त्यात किसलेले काकडी गाजर कांदा स्प्राउट्स, चीज़ व मिरे पुड घालुन एकजीव करावे.

  3. 3

    मेयॉनीस चे मिश्रण वेळेवरच करावे म्हणजे त्याला पाणी नाही सुटणार. आत्ता दोन्ही पराठ्याला शेजवान चटनी लावा (सँडविच करतांना ब्रेड लबुत्तेर जसे लावतात तसे)आत्ता एका पराठ्या वर मेयॉनीस चे केलेले मिश्रण घाला.व पराठा वर व्यवस्थीत जाडसर पसरवून घ्या.

  4. 4

    आत्ता त्या वर चटनी लावलेला दुसरा पराठा ठेवा व असे सगळे डिस्को पराठा सैंडविच करुन घ्या. व सॉस सोबत सर्व्ह करावे....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes