दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week4
Post 1
Gravy
गोल्डन एप्रन साठी ग्रेव्ही हा किवर्ड घेऊन मी दही भेंडी बनवली.

दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)

#GA4 #week4
Post 1
Gravy
गोल्डन एप्रन साठी ग्रेव्ही हा किवर्ड घेऊन मी दही भेंडी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
3 माणसे
  1. 1/4 किलोभेंडी
  2. 1/4 कपबेसन
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टिस्पून हळद
  5. 1 टेबलस्पूनधणेजिरे पूड
  6. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1/4 कपदही
  8. 3 टेबलस्पूनतेल
  9. चवीनुसार मीठ
  10. वाटण:::
  11. 1टोमॅटो चिरलेला
  12. 7-8लसूण पाकळ्या
  13. 1हिरवी मिरची
  14. 2-3आल्याचे तुकडे

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम बेसन, गरम मसाला, धणेजीरे पूड, हळद, लाल तिखट सर्व मिक्स करून घ्या. टोमॅटो, मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट करून घ्या.

  2. 2

    भेंडी धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. भेंड्यांचे मोठे तुकडे करा. मग कढईत तेल गरम करून भेंडी शॅलो फ्राय करा. फ्राय करताना त्यावर थोडं मीठ भूरभूरा.

  3. 3

    आता पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर वाटण टाकून चांगले परतून घ्या. तेल सुटायला लागले की मिक्स केलेले मसाले टाकून परता.मग दही घालून मिक्स करा.

  4. 4

    आता फ्राय केलेली भेंडी घालून परतून घ्या. दोन मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. मग झाकण काढल्यावर चवीनुसार मीठ घालून परता. भेंड्यांच्या भाजीमध्ये कधीही सगळ्यात शेवटी मीठ घालावे. नाहीतर भाजी चिकट होते.

  5. 5

    भाजीला चांगली उकळी आली की कोथिंबीर घालून गॅस बंद करा. गरम गरम भाजी पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या (2)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
खूप छान रेसिपी आहे, मी नक्की ट्राय करून पाहिलं.

Similar Recipes