भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#लंच
#cooksnap
#Dipti Pediyar
#भेंडी मसाला
मी सहसा भेंडीची साधी भाजी बनवते. पण आज भेंडी मसाला करून बघितली, खूपच छान झाली.

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#लंच
#cooksnap
#Dipti Pediyar
#भेंडी मसाला
मी सहसा भेंडीची साधी भाजी बनवते. पण आज भेंडी मसाला करून बघितली, खूपच छान झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३ जण
  1. २५० ग्राम भेंडी
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 तुकडा आलं
  6. 1 टेबलस्पूनभाजलेलं बेसन
  7. 2 टेबलस्पूनदही
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनधनेजिरे पावडर
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनगरम मसाला
  12. तेल
  13. तेजपत्ता
  14. 1 टीस्पूनजीरे
  15. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  16. कसुरी मेथी
  17. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    भेंडीचे देठ व पाठीमागचा भाग कापून टाका. मध्ये चीर द्या व कढईत तेल घालून त्यावर भेंडी थोडं मीठ घालून फ्राय करून घ्या.

  2. 2

    मिक्सरममध्ये आलं, हिरवी मिरची व टोमॅटो घालून पेस्ट करून घ्या.

  3. 3

    पॅनवर तेल गरम करून त्यात तेजपत्ता, जीरे, हिंग, चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परता. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, धनेजिरे पावडर, हळद, तिखट घालून परता.

  4. 4

    आता टोमॅटोची वाटलेली पेस्ट घाला वरून भाजलेलं बेसन भुरभुरा, थोडं पाणी घालून चांगलं एकजीव करा झाकण ठेवून ३ मिनिटे शिजवा. नंतर फेटलेलं दही घालून २ मिनिट शिजवा.

  5. 5

    आता फ्राय केलेली भेंडी, कसुरी मेथी हातावर चुरून व गरम मसाला, मीठ घालून एकजीव करा.

  6. 6

    कोथिंबीर पेरून मस्त गरमागरम चपाती बरोबर सर्व्ह करा भेंडी मसाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes