दह्याचे बेसन (dahi besan recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#पश्चिम#महाराष्ट्र खास वैदर्भीय असे हे दहयाचे बेसन म्हणा किंवा पिठले, पण झटपट होणारे आणि गरमागरम भाकर, पोळी किंवा खिचडी सोबत जोडी जमवणारे दह्याचे बेसन, म्हणजे भुकेल्या जीवाला आधार... आणि या सोबत गरम तेलात तळलेली हिरवी किंवा लाल मिरची आणि लसूण... मग काय विचारता...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
3_4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 मेजरींग कप दही आंबट
  2. 1 मेजरींग कप बेसन
  3. 3-4हिरव्या मिरच्या चिरून
  4. 10-12कढीलिंबाची पाने
  5. 1 टेबलस्पूनआले लसूण मिरची पेस्ट
  6. चवीनुसार तिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनधने पावडर
  9. चवीनुसार मीठ
  10. 1 टेबलस्पूनथोडीशी कोथिंबीर
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 1 टीस्पूनजिरे मोहरी
  13. 300 मिली पाणी

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    प्रथम एका भांड्यात दही घ्यावे व त्यात बेसन टाकून चांगले घुसळून घ्यावे. व ते मिश्रण थोडे पाणी घालून पातळ करून घ्यावे. गॅस सुरू करून, त्यावर कढई ठेवून, एक टेबलस्पून तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर, त्यात जिरे, मोहरी, मिरची आणि कढीलिंबचा पाला टाकावा.

  2. 2

    मोहरी तडतडल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, धने पावडर टाकून चांगले एकत्र करावे. तयार बेसनाचे मिश्रण त्यात हळू हळू टाकून गुठळ्या होऊ न देता मिसळून घ्यावे. व पुन्हा कढी पेक्षा घट्ट होईल इतके पाणी टाकावे. एकूण 300_ 350 मिली पाणी लागते.

  3. 3

    झाकण ठेऊन 5 मिनिट शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून एकत्र करून घ्यावे. गरमागरम भाकरी

  4. 4

    हे गरमागरम बेसन भाकरी, पोळी, किंवा खिचडी सोबत, त्यावर गरम तेल तळलेली मिरची, सोबत ज्वारीचे पापड आणि घोळाना, म्हणजे जेवणाचा बेत कुणालाही आवडेल असाच होईल...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes