फाफ्डा (fafda recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#पश्चिम#गुजरात
फाफ्डा म्हटले की सब टीवी वरिल मलिक "तारक मेहता का उलटा चष्मा" मधिल जेठालाल आठवतो जलेबी फाफ्डा वरिल त्याचे प्रेम आणी ती खायला मिळावी म्हणून त्याची धडपड पाहुन हसूच येते आणी उत्सुकता पण शिगेला पोहचते.. नेमके काय असे सोने लाग्लेय त्या जलेबि फाफ्डयाला. मग एका रविवारी सकाळचा नाश्ता ठरला जलेबी फाफ्डा त्या बरोबर मिळणारी चटनी आणी तळलेली मिरची.. हे कोम्बिनेशन तोंडात गेल्या गेल्या... वाह्ह्ह क्या बात असे म्हणावेसे वाटले पण खरच जेठालाल सारखे हरवून गेले अणि समजले काय असते ती धडपड हे स्वर्ग सुख मिळवण्याची... चला तर मग तुम्हाला ही ह्या अप्रतीम फाफ्डा ची हवी हवी अशी टेस्टे शिकवते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
3 जण
  1. 100 ग्रॅमबेसन
  2. 1/2 टीस्पूनओवा
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1/4 टीस्पूनखायचा सोडा
  5. 2चिमटी हळद
  6. 1/4 कपपाणी
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    प्रथम सगळे घटक एका जागी जमा करावे. पसरट कढईत तेल गरम करण्यास मंद आचेवर ठेवा. आत्ता बेसन चाळुन घेउन त्यात दोन टीस्पून तेल, ओवा,मीठ खायचा सोडा,हळद घालुन एकत्र करा

  2. 2

    कोरडा बेसन गोळा बांधता आला तर समजावे की तेल संपुर्ण पणे बेसनंला लागले आत्ता थोडे थोडे करुन पाणी घालुन मळुन घ्या व थोडा तेलाचा हात घेउन पण मळावे. पोळपाटाला थोडे तेल लववेव फोटोत दाखविल्या प्रमाणे बेसनाच छोटा लम्बोळ्का गोळा घ्यावा.

  3. 3

    अत्ता त्या लांब गोळ्याला पोळपाटाच्या कडेला ठेवा व मनगटाच्या आतील बाजुनी (फोटोत दखवलेय) त्या गोल्यवर एक सारखा दाब देत लांब पसरवायचे. व काढतांंना चाकुनी वरिल बाजुनी हळु हळू काढत आणा पण मी इथे माझ्या सोयी नुसार जाड बाजुनी हलके हातांनी उचलतच काढले.

  4. 4

    असे लांब फाफ्ड़े करत तबडतोब तेलात सोडा व आपण शेव जशी एकबजुनी टाळतो तसे सगळे फाफ्ड़े तळून काढावेत. तळली मिरची, चटणी व जलेबी सोबत गरमगरम सर्व्ह करावे... फाफ्डा जलेबी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes