अंडा भुर्जी राईस (egg bhurji recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#worldeggchallenge
रेसिपी क्र.1
हा भात मी नेहमी करते. खूप छान लागतो. झटपट तयार होतो.

अंडा भुर्जी राईस (egg bhurji recipe in marathi)

#worldeggchallenge
रेसिपी क्र.1
हा भात मी नेहमी करते. खूप छान लागतो. झटपट तयार होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 2 कपशिजवलेला थोडा मोकळा भात
  2. 2मोठे कांदे
  3. 1मध्यम आकाराचा टोमॅटो
  4. थोडी कोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनचिकन मसाला
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1.1/2 टीस्पून मीठ
  8. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 4-5अंडी
  10. थोडे तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    कांदा,टोमॅटो,कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत.भात मोकळा शिजवून घेणे.

  2. 2

    कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे.कांदा गुलाबी सर भाजून झाला की चिरलेला टोमॅटो घालून परतवून घेणे.

  3. 3

    सर्व मसाले,मीठ घालून परतवून घेणे. अंडी फोडून घालावे. व्यवस्थित मिक्स करून घेणे व झाकण ठेवून देणे. अंडी शिजली की गॅस बंद करावा.अंडा भुर्जी तयार.

  4. 4

    शिजवलेला भात ताटलीत मोकळा करून घेणे.अंडा भुर्जीची कढई मंद गॅसवर ठेवावी. मोकळा केलेला भात घालून चांगले मिक्स करून घेणे. झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी.वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.

  5. 5

    गरमागरम अंडा भुर्जी राईस तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes