एग व्हाईट एग्झाॅटिक व्हेजी डोनट्स (egg white exotic veggie donuts recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#worldeggchallenge
एग व्हाईट हा प्रोटीन चा मुख्य स्त्रोत आहे.
एग व्हाईट ला भरपूर प्रमाणात बायोलॉजिकल व्हॅल्यू दिली गेली आहे म्हणजेच मनुष्य शरीरासाठी लाभदायक पाचक व हितकारक आहे.
सहजपणे मानवी शरीरात शोषले जाते.
या रेसिपी मध्ये एग व्हाईट सोबत वापरले जाणारे पनीर सुद्धा प्रोटीनचे एक महत्वाचे स्त्रोत मानले जाते.
सोबतच वापरल्या जाणाऱ्या रंगबिरंगी विदेशी भाज्यांनी ही रेसिपी सर्वगुणसंपन्न मानल्या जाईल.
चला तर मग तयार करूया एग व्हाईट एक्झॉटिक व्हेजी डोनट्स.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 600 मिली एग व्हाईट
  2. 200 ग्रॅमपनीर
  3. 2 टीस्पूनव्हाईट पेपर पावडर
  4. 1 टीस्पूनगार्लिक पावडर
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1 मिडीयम साईज पिवळी झुकीनी
  7. 1 मिडीयम साईज हिरवी झुकीनी
  8. 1लाल शिमला मिरची
  9. 1पिवळी शिमला मिरची
  10. 15-16पाने पार्सली
  11. 50 ग्रॅमरेड कॅबेज
  12. 1मिडीयम साईज गाजर
  13. 100 ग्रॅमब्रोकोली
  14. 2 टीस्पूनअॉलिव अॉईल
  15. गार्निशींग साठी अॉईस्टर सॉस आणी शेजवान सॉस

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    सर्व प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्यावे व एका पॅनमध्ये एक टीस्पून तेल घेऊन त्यात भाज्या घालावे.
    त्यावर मीठ व पेपर पावडर टाकून भाज्या, 2-3 मिनिटे साॅटे करावे.
    एकीकडे मिक्सरच्या पॉट मध्ये एग व्हाईट घ्यावे.

  2. 2

    एग व्हाईट मध्ये पनीर घालावे.
    सोबतच मीठ, पेपर पावडर व गार्लिक पावडर अॅड करावे.
    हे सर्व मिश्रण मिक्सर मधून दोन ते तीन मिनिट फिरवून घ्यावे.
    असे केल्याने आपले मिश्रण फ्लफी व सॉफ्ट तयार होईल.
    हे मिश्रण बाजूला ठेवावे.

  3. 3

    आता डोनटचे मोल्ड घ्यावे व त्याला तेलाने ग्रीस करावे.
    साॅटे केलेल्या भाज्या या डोनट मोल्ड मध्ये ऍड करावे.
    त्यावरून अंड्याचे मिश्रण घालावे.

  4. 4

    डोनट चे मोल्ड प्री-हीट केलेल्या मायक्रोवेव मध्ये तीन ते चार मिनिट ठेवावे.
    तीन ते चार मिनिटानंतर मोल्ड बाहेर काढावे व हे डोनट थंड होऊ द्यावे.
    थंड झाल्यानंतर डोनट प्लेटमध्ये सजवावे व त्यावरून ऑईस्‍टर सॉस व शेजवान सॉस ने गार्निश करावे.

  5. 5

    आपले एग व्हाईट एक्झॉटिक व्हेजी डोनट रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes