कांचीपुरम इडली साऊथ इंडियन (kanchipuram Idli recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#दक्षिण
#तमिलनाडू
साउथ मधे बहूतेक प्रत्येक शहराच्या नावाने काही ना काही पदार्थ फेमस आहेत च.जसे म्हैसुर डोसा,म्हैसुर बोंडा,कडा प्रसाद....
तशीच ही कांचीपुरम शहराची स्पेशालिटी
authentic कांचीपुरम इडली .....खुप पौष्टीक आणि चविष्ट....तर खास सगळ्यांसाठी याची रेसिपी ....

कांचीपुरम इडली साऊथ इंडियन (kanchipuram Idli recipe in marathi)

#दक्षिण
#तमिलनाडू
साउथ मधे बहूतेक प्रत्येक शहराच्या नावाने काही ना काही पदार्थ फेमस आहेत च.जसे म्हैसुर डोसा,म्हैसुर बोंडा,कडा प्रसाद....
तशीच ही कांचीपुरम शहराची स्पेशालिटी
authentic कांचीपुरम इडली .....खुप पौष्टीक आणि चविष्ट....तर खास सगळ्यांसाठी याची रेसिपी ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2पेले तांदूळ
  2. 1 वाटीउडद डाळ
  3. 1/2 वाटीचणा डाळ
  4. 1 चमचामेथी दाणे
  5. 1गाजर किसुन
  6. कोथिंबिर बारीक चिरलेली
  7. 1 चमचामोहरी
  8. 1 चमचाजीरे
  9. तेल आवश्यकतेनुसार
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 चमचाबेकींग सोडा
  12. 7-8पाने कढीपत्ता
  13. 7-8काजुंचे बारीक तुकडे
  14. 7-8बदामाचे बारीक तुकडे
  15. 10-15किसमीस
  16. 2सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे
  17. 1/2 चमचाहळद
  18. 1/2 चमचाहिंग
  19. खोवलेले खोबर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम डाळ तांदूळ स्वच्छ धुवुन त्यात पाव चमचा मेथी दाणे घालुन सहा तास भिजत घाला.नंतर मिक्सर मधे वाटून घ्या.

  2. 2

    आणि वाटल्यानंतर याला दहा मिनिटे हाताने छान फेटुन घ्या आणी रात्रभर आंबायला ठेवा.म्हणजे सकाळी फोटोत दाखवल्याप्रमाणे पिठ अंबल्या वर फुगुन येईल आणि लवचिक होईल. जर पिठ छानअंबाला असेल झाले तरच इडली छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल.

  3. 3

    आता या पिठात मीठ,किसलेले गाजर,बेकींग सोडा,कोथिंबिर, घाला.काजु,बदाम,किसमिस घाला आणि आता याला छान तडका द्या. त्यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,हिंग,हळद,कढीपत्ता,सुक्या मिरच्या व एक चमचा चणा डाळ घालुन पिठात घाला. छान मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता इडली मोल्ड ला तेलाने ग्रिसिंग करून घ्या.आणि त्यात इडली पिठ घालुन ईडल्या लावुन घ्या.आणि पंधरा मिनिटे स्टीमर मधे वाफवुन घ्या.

  5. 5

    आता ईडल्या वाफवुन तयार आहेत.त्यावर मस्त जीरे मोहरी हिंग तेलाचा तडका द्या.वरुन कोथिंबिर,खोवलेले खोबर घाला.

  6. 6

    आता मस्त गरमगरम ईडल्या सांभर आणी चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes