गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक (gavache pitha healthy cake Recipe in Marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#GA4 #Week14
#Wheat cake हा कीवर्ड घेऊन मी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनविला आहे. हा केक गूळाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहे आणि शूगर पण फ्री आहे.

गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक (gavache pitha healthy cake Recipe in Marathi)

#GA4 #Week14
#Wheat cake हा कीवर्ड घेऊन मी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनविला आहे. हा केक गूळाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहे आणि शूगर पण फ्री आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
६ जणांसाठी
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 3/4 कपगूळ किसलेला
  3. 1/4 कपतूप
  4. 1 टीस्पून बेकिंग पावडर
  5. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  6. 1/3 कपदूध
  7. 1 चिमूटभरमीठ
  8. 1/4 कपबदाम आणि काजू
  9. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका ताटात चाळणी घेऊन त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून चाळून घ्यावे. नंतर गॅसवर कढई मध्ये स्टॅण्ड ठेवून फ्री हिट करायला १० मिनिटे ठेवावे.

  2. 2

    नंतर एका भांड्यात किसलेला गूळ, तूप आणि दूध घालून हिस्करने मिक्स करावे आणि या मिश्रणाला गूळ जोपर्यंत विळघळत नाही तोपर्यंत फेटून घ्यावे. नंतर त्यात चाळून घेतलेले पीठाचे मिश्रण थोडे थोडे घालून मिक्स करावे आणि फेटून घ्यावे.

  3. 3

    नंतर एका डब्याला तेल लावून त्यावर पीठ घालून काढून घ्यावे. नंतर तयार मिश्रणात व्हॅनिला इसेन्स आणि मीठ घालून मिक्स करावे आणि जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर दूध घालावे आणि मिक्स करावे नंतर हे मिश्रण तेल आणि पीठ लावून ठेवलेल्या डब्यात ओतावे.

  4. 4

    नंतर त्यावर आवडीनुसार बदाम आणि काजू लावून डेकोरेट करावे आणि गरम केलेल्या कढईमध्ये ठेवून ३५ ते ४० मिनिटे बेक करून घ्यावे.

  5. 5

    ३५ मिनिटांनंतर केक मध्ये टूथपिक टाकून चेक करून घ्यावे आणि जर टूथपिकला मिश्रण चिकटले तर केक आणखी ५ मिनिटे झाकून ठेवावे आणि जर नाही मिश्रण चिकटले तर केक तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes