पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#स्नॅक्स #मुबंई मधे वडापाव नंतर पावभाजी चा नंबर लागतो .पोटभरू स्ट्रीट फुड.

पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

#स्नॅक्स #मुबंई मधे वडापाव नंतर पावभाजी चा नंबर लागतो .पोटभरू स्ट्रीट फुड.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30/40 मिनीटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपफ्लाॅवर
  2. 1 कपबटाटा
  3. 1/2 कपमटार
  4. 1/2 कपसिमला मिरची
  5. 1 कपटोमॅटो क्युरी
  6. 1 टेबलस्पूनआललसुण पेस्ट
  7. 1 कपकांदा चिरलेला
  8. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 5/6 टेबलस्पूनबटर
  12. 3/4 टेबलस्पूनकोथिंबिर चिरलेली
  13. 10/12पाव

कुकिंग सूचना

30/40 मिनीटे
  1. 1

    भाज्या सर्व धुवून घेणे. सिमला मिरची, फ्लाॅवर,मटार,बटाटा कुकरमधे वाफवून घेणे.सिमला मिरची व फ्लावर चिरावे.

  2. 2

    टोमॅटो ची क्युरी करून घेणे.कांदा, कोथिंबीर बारीक चिरणे.

  3. 3

    कढईत तेल किंवा बटर 3 टेबलस्पून टाका नि त्यात चिरलेला पाव कप कांदा टाकून परतून घ्या त्यामधे आललसुण पेस्ट, लाल तिखट,हळद, मीठ घाला परता नि नंतर टोमॅटो क्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या आता पाव भाजी मसाला घाला व परता त्यात शिजलेल्या भाज्या स्मॅश करून घाला. भाजी 10 मिनिटे शिजवा.

  4. 4

    पावभाजी तयार आहे ह्यात तुम्ही जास्त बटर घालून घेऊ शकता मी कमी घालते.वर कोथिंबीर घाला, कच्चा कांदा,लिंबू द्या नि पाव छान बटर मधे परतून खायला द्या.तुम्हाला चीज आवडत असेल तर चीज किसून पावभाजी वर घाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes