व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133

व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50min
6 सर्व्हिंग्ज
  1. 3 कपबासमती तांदूळ
  2. 1/2 कपफुलकोबी
  3. 1/2 कपआलू
  4. 1/2 कपबीन्स
  5. 1/2 कपमटार
  6. 1/2 कपगाजर
  7. 1/2 कपशिमला मिरची
  8. 1/2 कपटोमॅटो
  9. 2ऑनियन
  10. 1 कपदही
  11. 3 टेबलस्पूनतिखट
  12. 2 टेबलस्पूनधने पावडर
  13. 2 टेबलस्पूनजीरे पावडर
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनसाखर
  16. 2 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  17. 2 टीस्पूनमीठ
  18. 1 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  19. 3-4 लवंग
  20. 3-4विलयाची
  21. 1तमालपत्र
  22. 1/4 कपतूप
  23. 1 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  24. आवडीनुसार पुदिना

कुकिंग सूचना

50min
  1. 1

    सर्वप्रथम 3 कप बासमती राइस स्वच्छ धुवून अर्धा तास भिजू घालावे. आलू, कोबी, मटार, गाजर, बीन्स आणि शिमला मिरची चोप करून घ्यावी. त्यानंतर एका बाउल मध्ये दही घ्यावे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तिखट, धने पावडर, जीरे पावडर, बिर्याणी मसाला, थोडी हळद व मीठ घालून मिक्स करावे व त्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करून ते मॅरीनेट करायला अर्धा तास ठेवावे.

  2. 2

    एका कढईमधये तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा छान परतला गेला की आले लसूण पेस्ट घालावी व परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट, जीरे पूड, धने पूड, बिर्याणी मसाला, मीठ मिसळावे व त्यात पुदिना चे पाने हाताने बारीक करून टाकावे व ते छान परतून घ्यावे. बारीक चिरलेले टोमॅटो घालावा, टोमॅटो होत आला की त्यात मॅरीनेट केलेल्या व्हेजिटेबल मिक्स करून ते परतावे..

  3. 3

    दुसऱ्या गॅस वर पाणी गरम करावे. त्यात तूप, लवंग, विलायाची, तमालपत्र व बासमती राइस घालून 4 ते 5 मिनिटे कुक होवू द्यावा. 5 मिनिटानंतर पाणी ड्रेन करून राइस एका चाळणीत ठेवावा. व व्हेजिटेल थोडया कूक झाल्या की त्यात राइस घालावा. नंतर आपल्या बिर्याणी ला छान कलर व चव येण्यासाठी त्यात केशर चे पाणी व बरिक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवावे.

  4. 4

    10 ते 15 मिन बिर्याणी कमी गॅस वर शिजु द्यावी.. बिर्याणी होत आली की त्याचा सुगंध येईल. गरमा गरम बिर्याणी खायला तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रोजी

Similar Recipes