चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week17
#keyword_cheese
एक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋

चीझ पिझ्झा पराठा (cheese pizza paratha recipe in marathi)

#GA4
#week17
#keyword_cheese
एक दिवस आर्यदित्य(मुलगा) अगदी हट्टाला पेट ला की पिझ्झाच हवा ... आयत्या वेळी कुठून येणार पिझ्झा बेस मग थोडी शक्कल लढविली आणि बनविला चीझ पिझ्झा पराठा..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
२-३
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 4-5चीझ स्लाईसेस
  3. 1 टीस्पूनओरिगानो
  4. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  5. मीठ चवीनुसार
  6. 2-3 चमचेतेल/बटर
  7. 1सिमला मिरची
  8. गाजर
  9. छोटा कांदा
  10. 4-5 टेबलस्पूनकिसलेले पनीर

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    पोळी साठी मळतो तशी कणिक मळून घ्या. आणि झाकून ठेवा. तोपर्यंत भाज्या कट करून घ्या.

  2. 2

    एका कढईत थोडे तेल घालून कांदा परतून घ्या त्यात चिरलेल्या भाज्या घालून वाफ आणावी आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्या त्यात ओरीगानो, मीठ, चिली फ्लेक्स आणि किसलेले पनीर घालून मिक्स करावे. आपले फिलिंग तयार आहे.

  3. 3

    कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची गोल पोळी लाटून घ्यावी त्याच्या वर मध्ये एक चीझ स्लाइस ठेवून तयार फिलिंग २ चमचे घालून पसरून घ्या.

  4. 4

    आता पोळी आधी खालच्या बाजूस बंद करून मग बाजूच्या कडा घेऊन त्रिकोणी आकाराचा पराठा बनवा. आणि आवडीनुसार तेल/बटर लावून भाजून घ्या आणि गरम गरम सर्व्ह करा सॉस बरोबर...

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes