पनीर भाजी/ पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#लंच
#साप्ताहिक_लंच_प्लॅनर
#पनीर_भाजी
पनीर लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वानाच आवडीच आहे. आज मी पनीर मसाला ही रेसिपी केली आहे ती खालीलप्रमाणे 😊👇

पनीर भाजी/ पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक_लंच_प्लॅनर
#पनीर_भाजी
पनीर लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सर्वानाच आवडीच आहे. आज मी पनीर मसाला ही रेसिपी केली आहे ती खालीलप्रमाणे 😊👇

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
4 व्यक्तींसाठी
  1. 200 ग्रॅमपनीर
  2. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  3. 3कांदा प्युरी
  4. 1 इंचआल
  5. 5/6लसूण पाकळ्या
  6. 3टोमॅटो प्युरी
  7. 1दालचिनी
  8. 3लवंगा
  9. 2हिरवी विलायची
  10. 1 टीस्पूनकाश्मिरी तिखट कलरसाठी
  11. 1 टीस्पूनधने पावडर
  12. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  13. 1/4 टीस्पूनहळद
  14. 1/2 टीस्पूनमिरी पावडर
  15. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  16. कोथिंबीर
  17. चवीनुसारमीठ
  18. तेल

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    पनीरचे चौकोनी तुकडे करून मीठ आणि लाल तिखट लावून पाच मिनिटे ठेवावे. कढईत 1टीस्पून तेल घालून पनीर दोन मिनिटं परतून घ्यावे.

  2. 2

    त्याच कढईत दोन टेबलस्पून तेल घालून दालचिनी, लवंग, विलायची घालून परतून घ्यावे. तीन कांदे, आल, लसूण यांची पेस्ट करून घालावी.थोड मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  3. 3

    कांदा छान परतल्यानंतर काश्मिरी तिखट, कसुरी मेथी, हळद, धने पावडर, मिरी पावडर घालून परतून घ्यावे. टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. ग्रेव्ही साठी पाणी घालून परतून घ्यावे.

  4. 4

    गरम मसाला, कोथिंबीर, पनीर घालून परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे.

  5. 5

    दोन मिनिटं परतून घ्यावे. पनीर भाजी/ मसाला तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes