कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#wd
#Cooksnap
माझी रेसिपी मे डेडीकेट करते माझ्या आईला 🥰 पनीर सोबत आईच्या खूप आठवणी आहेत
तिनेच मला सगळ्यात पहिले पनीरची भाजी शिकवलीं ,व डेडीकेट करते माझ्या सर्व मैत्रिणींना😊😘

आज मी भाग्यश्री ताई यांची कढाई पनीर ही रेसिपी कुक स्नॅप केली आज घरात पनीर होते व भाग्यश्री ताईंची रेसिपी बघितली छान वाटली म्हणून मी केली😊🌹🙏

पनीर म्हंटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचे आहे 😋
पनीर घरात केले की सगळेजण खुश होतात 🤗

आज मी पनीरची भाजी थोडा बदल करून केली आहे घरात सगळ्यांना आवडली आणि खूप छान झाली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चला तर मग पाहूया कढाई पनीर रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
सहा व्यक्ती
  1. अडीचशे ग्रॅम पनीर
  2. 1सिमला मिरची
  3. 1मोठा टमाटा
  4. 2मोठे कांदे
  5. 1हिरवी मिरची
  6. तुकडेचार-पाच बीटाचे
  7. 1 चमचातीळ
  8. 1 चमचाओवा
  9. 1 चमचाधने
  10. 1 टेबलस्पूनसोफ
  11. 5सहा लसूण पाकळ्या
  12. तुकडेचार-पाच बारीक केलेले अद्रकाचे
  13. 1हिरवी वेलची
  14. 1 तुकडादालचिनी
  15. 1 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  16. 1 टेबलस्पूनहळद
  17. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  18. कसुरी मेथी
  19. 1 छोटा चमचासाखर
  20. 1 चमचामलाई
  21. चवीनुसारमीठ
  22. आवश्यकतेनुसार पाणी
  23. फोडणीसाठी तेल

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कढाई मसाला तयार करून घ्यावा त्यासाठी एक चमचा धने जीरे सोफ तीळ हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा सर्व एकत्र करून थोडेसे भाजून घ्यावे हलके भाजल्यावर त्यात कश्मिरी मिरची पावडर टाकावी

  2. 2

    भाजलेले सर्व मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात पूड करून घ्यावी

  3. 3

    आता फेस्ट करण्यासाठी एक टमाटा एक कांदा एक हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या चार-पाच अद्रकाचे तुकडे व थोडे बीट(कलर येण्यासाठी मी बीट घातले) बारीक कापून घ्यावेत

  4. 4

    एका पॅनमध्ये तेल टाकून बारीक चिरलेले कांदा हिरवी मिरची बीट अद्रक लसन टमाटा टाकावा थोडे परतून घ्यावे

  5. 5

    थंड झाल्यानंतर याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी

  6. 6

    आता एक कांदा व सिमला मिरची व पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यावे

  7. 7

    एक कढई घेऊन ती गॅसवर ठेवावी त्यात थोडे तेल टाकावे तेल तापले की जीरे घालावे जीरे तडतडले कि कांदा टाकावा कांदा गुलाबीसर झाला कि सिमला मिरची टाकावी नंतर पनीर टाकावे व आपण केलेला कढाई मसाला टाकावा थोडं परतून घ्याव

  8. 8

    यात आता वरील केलेली पेस्ट टाकावी त्यात तिखट हळद मीठ चवीनुसार साखर टाकावी घट्ट झाल्यास थोडे पाणी टाकावे

  9. 9

    पाणी टाकल्यानंतर थोडं होऊ द्यावा व वरून कसुरी मेथी घालावी थोडी मलाई वरतून घालावी झाकण ठेवावे गॅस बंद करावा

  10. 10

    गरमागरम कढाई पनीर फुलके किंवा भातासोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes