उकडलेली बोरं (ukadleli bore recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#मकर
मकर संक्रांत तसा सगळ्यांनाच माहित असलेला सण.जस जसा दिवस वाढत जातो तशीच थंडी संपता संपता पण वाढत जाते. म्हणून तिळ व गूळ जसा महत्वाची तसेच ह्या वेळेला मिळणारे ऊस,बोरं, हरभरा,वाटाणे, गाजर पण महत्वाचीच असतात.. हे पुजेसाठी सुग्ड्या मधे घालतात व ओटी भरतांना पण घालतात. आत्ता ह्यातले काही तेव्हाच फस्त होतात तर काही तसेच राहातात. ह्यात असलेली बोरं अणि थोडी आणखी भर घालुन हा पद्धार्थ करते तसे ही हा केलेला प्रकार लहान्नान पासुन मोठ्यांन पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे.. सोपी अशी ही रेसिपी तुमच्या साठी..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30-40 मिनिट
4 जण
  1. 400 ग्रॅमबोरं (अर्धवट वाळलेलि)
  2. 175 ग्रॅमगूळ
  3. 25 ग्रॅमसाखर
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. पाणी

कुकिंग सूचना

30-40 मिनिट
  1. 1

    सगळ्या सामानाची जुळवा जुळव करुन घ्या, आत्ता एका कूकर मधे बोरं धून,बोरं बुड़ेल इतके पाणी घाला.आत्ता त्या मधे गूळ घाला.

  2. 2

    आत्ता त्यात साखर व मीठ घालुन झाकण लावुन गैस वर ठेऊन तीन शिट्टया हाई फ्लेम व दोन शिट्टया स्लो फ्लेम वर काढुन घ्या.

  3. 3

    कूकर पुर्ण थंड झाल्यावर ही बोरे एका भांड्यात काढुन घ्या (थोडे दाट हवे असेल तर अजुन थोडे उकळून घ्या) व सर्व्ह करतांना एका वाटी मधे बोरं,थोडे त्याचे गोड पाणी घेउन त्यावर थोडे तिखट व मीठ भुरभुरावे व टूथपिक लावुन आलेल्या पाहुण्यांना ही उकडलेली बोरं देऊन खुश करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes