तिळगुळाचे लाडू (Til Gulache Ladoo Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#मकर
#तिळगूळलाडू
#लाडू
#मकरसंक्रांती
#तिळाचेलाडू

संक्रांती काळात तीळ-गुळाचे लाडू सर्वजण खातात परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तिळ खाण्यासाठीही गरजेचं असते. धार्मिक कारणास्तव म्हणा किंवा आरोग्याच्या आधारावर म्हणा, तीळ खाणे खूप फायदेशीर आहे. मकर संक्रांतीवर तिळांचा वापर खूप होतो आणि तीळ प्रत्येक गोष्टीत समाविष्ठ करणं ही आवश्यक मानलं जातं.  अंघोळीच्या पाण्यापासून सूर्याला पाणी अर्पण करणं, पूजा आणि जेवण्यात तिळाचा प्रयोग आवश्यक आहे. तिळाशिवाय मकरसंक्रांती अपूर्ण असते. 
आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण बरेच आहे . पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल,
तिळात आहारातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड असतात आणि मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात. मकरसंक्रांतीच्या वेळी हवामान बरेच थंड असते. तीळ उबदार आहे आणि शरीराचे तापमान कमी होण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीर उबदार ठेवते. यामुळे शरीरात उर्जा पातळी कायम राहते.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मिनिट
  1. 300 ग्रामतीळ
  2. 250 ग्रामचिक्की गूळ

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम तीळ भाजून तयार करून घेऊ गूळ बारीक चाकूने चिरून घेऊ

  2. 2

    आता कढईत गूळ टाकून पक्का पाक तयार करून घेऊ (गोळी पाक) गुळाला चांगले बुडबुडे आले की त्यात तीळ टाकून घेऊ

  3. 3

    तीळ आणि गूळ चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊ
    हाताला तूप लावुन गोल गोल लाडू वळून घेउ, फटाफट लाडू वळुन घ्यायचे आहे.

  4. 4

    तयार आपले तिळगुळाचे लाडू

  5. 5

    'तिळगुळ घ्या गोड गोड बोला'

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes