बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#मकर
संक्रांत म्हटली कि तिळाचे लाडू, चिक्की बनवतोच त्यात आणखी काहीतरी वेगळं म्हणून मी बटरस्कॉच आणि चॉकोलेट वापरून चॉकोलेट बनविलेत खूप छान झाले आणि मुलांनाही आवडले तर पाहुयात बटरस्कॉच तीळ चॉकलेट चि पाककृती.

बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)

#मकर
संक्रांत म्हटली कि तिळाचे लाडू, चिक्की बनवतोच त्यात आणखी काहीतरी वेगळं म्हणून मी बटरस्कॉच आणि चॉकोलेट वापरून चॉकोलेट बनविलेत खूप छान झाले आणि मुलांनाही आवडले तर पाहुयात बटरस्कॉच तीळ चॉकलेट चि पाककृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपभाजलेले तीळ
  2. 1/2 कपभाजलेल्या शेंगदाण्याची भरड
  3. 1/2 कपचिकीचा गूळ
  4. 1 टीस्पूनतूप
  5. 2-3 ड्रॉपबटरस्कॉच इसेन्स
  6. ग्रीस करण्यासाठी तूप
  7. 200 ग्रामडार्क चॉकोलेट
  8. 200 ग्राममिल्क चॉकोलेट

कुकिंग सूचना

  1. 1

    आता कढईत गूळ, तूप घालून वितळवून घ्यावे, गूळ वितळल्यावर त्यात तीळ, शेंगदाण्याची भरड घालून इसेन्स घालून छान एकजीव करून गॅस बंद करून घ्यावा.

  2. 2

    एका थाळी ला तूप लावून त्यावर मिश्रण पसरवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याचा चुरा करून घ्यावा.

  3. 3

    आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून दुसऱ्या भांड्यात चॉकोलेट घालून ते भांडे गरम भांड्यावर धरून चॉकोलेट वितळवून घ्यावे.

  4. 4

    आता वितळलेले चॉकोलेट थोडं 2-3 मिनिट नंतर चॉकोलेट मोल्ड मध्ये लागेल त्याप्रमाणे चिक्की चा चुरा घालून मग त्यावर चॉकोलेट घालून घ्यावे. किंवा चॉकोलेट मध्ये चिक्कीचा चुरा घालून एकजीव करून घ्यावा आणि मोल्ड मध्ये घालून घ्यावा व त्यावर तीळ घालून घ्यावे.चॉकोलेट सेट झाल्यावर मोल्ड मधून काढून घ्यावे.

  5. 5

    बटरस्कॉच तीळ चॉकलेट खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या (14)

Similar Recipes