बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#GA4 #week18
#keyword_fish
आज मी ओले बोंबिल हा मासा केला आहे. अगदी सोपी पद्धत.. मोजकेच मसाले वापरून केले आहे. हा मासा माझा खूप आवडता आहे. खास करून वरण भात सोबत खूप आवडतो. 😊

बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)

#GA4 #week18
#keyword_fish
आज मी ओले बोंबिल हा मासा केला आहे. अगदी सोपी पद्धत.. मोजकेच मसाले वापरून केले आहे. हा मासा माझा खूप आवडता आहे. खास करून वरण भात सोबत खूप आवडतो. 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 4बोंबील
  2. 1/4 टीस्पूनहळद,
  3. 1 टीस्पूनलाल तिखट,
  4. 1/2 टीस्पूनआल लसूण पेस्ट,
  5. 1/2 टीस्पूनलिंबू रस,
  6. चवीनुसारमीठ,
  7. 4 टेबलस्पूनरवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    ओले बोंबिल साफ करून स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावे.

  2. 2

    त्याला हळद, लाल तिखट, आल लसूण पेस्ट, मीठ, लिंबू रस लावून पाच मिनिटे ठेवावे. बारीक रवा घेऊन त्यात बोंबिल घोळवून घ्यावे.

  3. 3

    तवा गरम करून तेल पसरवून घ्या. त्यावर बोंबिल घालून दोन्ही बाजूने ऊलटपालट करून भाजून घेणे. मध्ये थोड तेल सोडून भाजावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes