पापलेट तवा फ्राय (papplet tawa fry recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

नॉनव्हेज मध्ये मासा हा प्रकार मला अतिशय आवडतो आणि माशांमध्ये पापलेट हा खूपच झटपट होणारा आणि कमी काटे असणारा मासा आहे चवीलाही उत्तम लागतो अगदी खोबरे खाल्ल्यासारखा चला तर मग बणवूयात आपण पापलेट तवा फ्राय

पापलेट तवा फ्राय (papplet tawa fry recipe in marathi)

नॉनव्हेज मध्ये मासा हा प्रकार मला अतिशय आवडतो आणि माशांमध्ये पापलेट हा खूपच झटपट होणारा आणि कमी काटे असणारा मासा आहे चवीलाही उत्तम लागतो अगदी खोबरे खाल्ल्यासारखा चला तर मग बणवूयात आपण पापलेट तवा फ्राय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
4पापलेट
  1. 500 ग्रामपापलेट
  2. 2 टेबलस्पूनतांदूळ पिठ
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. मीठ चवीनुसार
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 2 टेबलस्पूनकोकम आगळ
  7. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  8. तेल

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम पापलेट स्वच्छ करून घ्या व त्याच्या पोटातील घाण काढून घ्यावी आणि नंतर मीठ लावून पापलेट स्वच्छ धुऊन घ्यावे आता आले-लसूण पेस्ट तांदळाचे पीठ हळद लाल तिखट मीठ सर्व एकत्र करून घ्यावे आणि हे मिश्रण पापलेटला लावावे

  2. 2

    सोबतच कोकम आगळ ही घालावे आणि हे सर्व व्यवस्थित पापलेटच्या शिरांमध्ये भरून घ्या यावे व्यवस्थित लावलेले पापलेट पुढे अर्धा तास तसेच मॅरीनेट करून ठेवावे

  3. 3

    आता लोखंडी तवा गरम करत ठेवावा वा आणि गरम झाल्यावर तेल सोडून त्या तेलात हे पापलेट एका बाजूने सर्व प्रथम पाच मिनिटे भाजून घ्यावे आणि नंतरच त्याची दुसरी बाजू पलटावी असे दोन्ही बाजूंनी पापलेट छान खरपूस भाजून घ्यावे जितका जास्त वेळ पापलेट मॅरीनेट होईल की त्याला चव छान येते हे पापलेट गरम गरम कोरडे खायला खूप छान लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes