पिठ पेरून मेथीची भाजी (pith perun methichi bhaji recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week19
#keyword_methi
मागे एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा त्यांनी दाणे पूर्ण बंद करायला सांगितले होते... तेव्हापासून पीठ पेरून भाजी बनवायला सुरुवात केली आणि सर्वांना खूप आवडली... आणि यातच जास्त पीठ घातले की मेथीचे पिठले तयार...

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१०-१५मिन
३-४
  1. 1जुडी मेथीची निवडलेली भाजी
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. १५-२० लसूण पाकळ्या
  4. 4 टीस्पूनडाळीचे पीठ
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. फोडणीसाठी जीरे , हळद, हिंग
  7. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१०-१५मिन
  1. 1

    प्रथम निवडलेली मेथीची भाजी धेऊन घ्यावी. लसूण पाकळ्या सोलून त्याचे आणि मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या

  2. 2

    एका कढईत कोरडेच डाळीचे पीठ १-२ मिनिट मध्यम आचेवर भाजून घ्या.

  3. 3

    ते पीठ काढून घ्या आणि त्यात चिरलेल्या मिरच्या, लसूण, जीरे हळद आणि हिंग घालून फोडणी करावी.

  4. 4

    त्यातच आता मेथीची भाजी घालून मिक्स करून घ्या आणि झाकून मध्यम आचेवर ३-४ मिनिट शिजू द्या.

  5. 5

    झाकण काढून त्यात मीठ आणि डाळीचे पीठ पेरून /मिक्स करून भाजीला कमी गॅसवर ३-४ मिनिट झाकून ठेवा. भाजी तयार... मस्त गरम भाकरी, मसाला पराठा किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा..

  6. 6
  7. 7

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
मोनाली भोईटे तुझी रेसिपी पिठ पेरून मेथीची भाजी मी बनवली( कुकस्नॅप ) खुपच मस्त झाली😋👌
धन्यवाद मोनाली🙏

यांनी लिहिलेले

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes