तांदुळाचे उकडीचे मोदक (tandalache ukadiche modak recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad

#26
🙏🎉🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस सर्वाना 🇮🇳🎉🙏

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं.हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि मंगळवार पण आहे आज या निमित्ताने गणपती बाप्पांसाठी #तांदुळाचे__उकडीचे__मोदक बनवले आहेत..

तांदुळाचे उकडीचे मोदक (tandalache ukadiche modak recipe in marathi)

#26
🙏🎉🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपणांस सर्वाना 🇮🇳🎉🙏

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं.हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि मंगळवार पण आहे आज या निमित्ताने गणपती बाप्पांसाठी #तांदुळाचे__उकडीचे__मोदक बनवले आहेत..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास (60मिनिटे)
4ते 5 जणांसाठी
  1. 1नारळ
  2. वेलची पूड आवश्यकतेनुसार
  3. 1 वाटीगुळ
  4. 1 टेबलस्पूनखसखस
  5. 10-12 मणुके
  6. 3-4 टेबलस्पून साजुक तुप
  7. पाणी
  8. 1 वाटीतांदुळाचे पीठ

कुकिंग सूचना

1तास (60मिनिटे)
  1. 1

    प्रथम नारळ फोडून खोवुन घ्यायचे खोबरे नंतर गुळ आणि खोबरं एकञ करून घ्या. (साधारण दोन वाटी खोबरं असेल तर एक वाटी किसलेला गुळ मिक्स करून घ्या) नंतर 1चमचा साजुक तूप घालावे कढईत तुप गरम झाले की खसखस टाकून घ्या मग लगेच गुळ नारळ चे मिश्रण टाकावे आणि परतून घ्यावे. सारण परतून झाले की वेलची पूड मणुके घालावे.

  2. 2

    त्यानंतर एका कढईत किंवा पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे त्या मध्ये अर्धा मीठ घालून उकळून द्या मग 1टेबलस्पून तुप टाका.नंतर लगेचच तांदुळाची पीठ घालून घ्या (1वाटी पीठ तर 1वाटी पाणी असे समप्रमाण घ्यायचे)आणि चांगले मिक्स करून घ्यावे. (गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी)

  3. 3

    पीठ चांगले मिक्स करून घ्यावे नंतर एका परातीत किंवा ताटात मोकळे करून घ्या पीठ

  4. 4

    त्यानंतर जरासे कोमट पीठ असतानाच हाताला तुपाचा हात लावून हळूहळू मळत जावे. मऊसूत पीठ मळुन घ्या.

  5. 5

    मग मी आज #तिरंगा मोदक दाखवत आहे तर मी इथे फुड कलर वापरले आहेत. फोटो मधे दाखवल्या प्रमाणे 👇मग मळुन घेतलेले पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या म्हणजे मोदक एकसमान बनतात आकाराने

  6. 6

    एक पिठाची गोळी घेऊन छान मळुन घ्या तुपाचा हात लावून घ्यावा आणि मग पारी बनवुन घ्या म्हणजे (वाटी सारखा आकार) करून घ्या. आणि मोदक साठी पाकळ्यांचा आकार बनवुन घ्या.मग सारण भरून घ्यावे..

  7. 7

    नंतर मी इथे फुलांचा आकार बनवुन मोदक तयार केला आहे.

  8. 8

    असे सगळे मोदक करून झाले की कलर लावून घया. मी हातानेच दिला कलर बोटाच्या सहाय्याने दिला आहे.

  9. 9

    नंतर मोदक पात्रात किंवा पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे त्या मध्ये चाळणीवर मोदक उकडून घ्यावेत. चाळणीला तुप लावून घ्यावे. म्हणजे मोदक चिकटणार नाहीत.

  10. 10

    मोदक 10मिनिटे तरी वाफवून घ्यावेत.

  11. 11

    मोदक जरासे थंड झाल्यावर मोदक काढून घ्यावे..गरमागरम साजुक तुप घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

Similar Recipes