रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
1-2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीदुधी
  2. 1/2कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 3लसूण पाकळ्या
  5. 1 इंचअद्रक
  6. 1/2 टीस्पूनजीर
  7. 1तेजपत्ता
  8. कोथिंबीर
  9. 1/2निंबू
  10. मीठ किंवा काळ मीठ
  11. 1 टीस्पूनबटर किंवा तूप
  12. 2-3काळी मिरी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम दुधीची साल काढून घ्या.(चाखून पहा की ती कडू तर नाहीना जर दुधी कडू असेन तर ती वापरून नका ती आरोग्यासाठी हानिकारक असते). मग बारीक कापून घ्या.

  2. 2

    कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्या. आलं लसूण बारीक कुटून घ्या.

  3. 3

    कुकर मध्ये बटर टाकून त्यात जीर, काळी मिरी, तेजपत्ता टाका व परतून घ्या.नंतर त्यात कांदा परतुन घ्या. कांदा थोडा मऊ झाल्यावर त्यात टोमॅटो टाका व परतून घ्या.

  4. 4

    नंतर त्यात बारीक चिरलेली दुधळी टाका व थोडं परतुन घ्या.नंतर त्यात 1 ग्लास पाणी, मीठ टाकून मिक्स करा व कुकर झाकून 3-4 शिट्ट्या करून घ्या. (मीठ टाकायचं नसेन तर काळ मीठ पण टाकू शकता).

  5. 5

    दुधी चे सारण चाळणीने चाळून घ्या, तेजपत्ता काढून ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्या.

  6. 6

    एका पॅन मध्ये दळून घेतलेत सारण व त्याचेच पाणी टाका व थोडी कोथिंबीर टाकून 2 मिनिट उकळून घ्या.

  7. 7

    गरमागरम दुधी भोपळ्याचे सूप थोडं बटर, निंबू,कोथिंबीर टाकून प्यायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

Similar Recipes