"खमंग खरपूस कडिपत्ता चटणी" (kadipata chutney recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#Cooksnap

आज मी कडिपत्ता चटणी माझी मैत्रीण भाग्यश्री ताई यांच्या रेसिपी प्रमाणेच थोडासा बदल करून बनवली आहे.. खुप मस्त खमंग चटणी झाली आहे.. Thank you dear Tai..

"खमंग खरपूस कडिपत्ता चटणी" (kadipata chutney recipe in marathi)

#Cooksnap

आज मी कडिपत्ता चटणी माझी मैत्रीण भाग्यश्री ताई यांच्या रेसिपी प्रमाणेच थोडासा बदल करून बनवली आहे.. खुप मस्त खमंग चटणी झाली आहे.. Thank you dear Tai..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
चार पाच जण आठवडाभर खाऊ शकतात
  1. 1 कपकडिपत्ता पाने
  2. 2 टीस्पूनचना डाळ
  3. 2 टीस्पूनउडीद डाळ
  4. 2 टीस्पूनतिळ
  5. 2 टीस्पूनजीरे
  6. 2 टीस्पूनलाल तिखट
  7. सात, आठ लसणाच्या पाकळ्या
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    कडिपत्ता पाने धुवून पुसून कपड्यावर सुकायला घालावीत..

  2. 2

    साहित्य एकत्र जमवून घ्यावे

  3. 3

    मंद गॅसवर पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालून प्रथम चना डाळ चांगली खमंग भाजून घ्यावी.. एका प्लेटमध्ये काढून घ्यावी..मग उडीद डाळ भाजून घ्यावी

  4. 4

    तिळ आणि जीरे हे पण वेगवेगळे भाजून घ्यावे.. सगळे जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यावे..

  5. 5

    नंतर अर्धा टीस्पून तेल घालून लसुण ही चांगला खरपूस भाजून घ्यावा,व राहिलेले अर्धा टीस्पून तेल घालून कडिपत्ता पाने भाजून घ्यावीत.

  6. 6

    मिक्सरच्या जारमध्ये पहिले चना डाळ, उडीद डाळ, जीरे,तिळ चांगले बारीक वाटून घ्यावे व नंतर लाल तिखट, मीठ, कडिपत्ता पाने घालून फिरवून घ्यावे..

  7. 7

    तयार झालेली खमंग चटणी एका वाटी मध्ये काढून घ्यावी.. भाकरी चपाती, भातासोबत सर्व्ह करावी..

  8. 8

    ही चटणी हवा बंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर टिकू शकते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes