रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#SWEET
रवा बेसन लाडू पाकातले
मला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया

रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)

#SWEET
रवा बेसन लाडू पाकातले
मला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
१२ सर्व्हिंग
  1. 1 कपमिडियम रवा
  2. 1/2 कपडाळीचे पीठ
  3. 1 कपसाखर
  4. 1/2 कपतूप
  5. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  6. जायफळ आवडीप्रमाणे
  7. पाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा.मी रवा आणि बेसन वेगळे भाजते.

  2. 2

    नंतर बेसन पण खमंग भाजून घ्यावे आणि बाजूला ठेवा.

  3. 3

    आता पाक करूया त्या साठी साखर बुडेल इतपत पाणी घालून हाताला चिकट लागेल इतपत पाक करावा.

  4. 4

    रवा आणि बेसन हाताने एकजीव करून घ्यावे.

  5. 5

    नंतर रवा आणि बेसन यांचे मिश्रण पाकात ओतावे.झाकण ठेवून बाजूला ठेवावे.

  6. 6

    पाच मिनिटांनी पाक मिश्रणात मुरल्यावर लाडू वळावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes