मॅगी_१९८३ (MAGGI 1983 RECIPE IN MARATHI)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#MaggiMagicInMinutes
#Collab
#मॅगी_१९८३
आजकाल हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत "मॅगी पॉइंट्स" झाले आहेत. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सबकुछ मॅगी टाईम आहेत.
पण माझा मॅगीशी संबंध आला १९८३ मध्ये, ३८ वर्षांपूर्वी, जेव्हा मॅगी बाजारात पहिल्यांदा आली (त्याच साली भारताने पहिला वर्ल्ड कप मिळवला होता)! तिचा आकार आजच्या मॅगीच्या दुप्पट होता आणि किंमत होती ₹२/-, होय, दोन रुपये. इतकंच नव्हे तर मॅगीच्या एका पाकिटावर २ स्केच पॅन मिळत होती, गिफ्ट म्हणून. एक लाल आणि एक हिरवं. आम्ही तेव्हा अशी लाल- हिरवी खूप स्केच पॅन गोळा केली होती.
मॅगी तेव्हा चिकन, लसूण, सांबार आणि कॅप्सिकम ह्या फ्लेवर मध्ये मिळे.

मात्र मॅगी खाण्याची परवानगी फक्त रविवारी संध्याकाळी असायची. आणि आईला हे खाणे निकृष्ट, निसत्त्व वाटायचं म्हणून मग ती त्यात जे जे काही घालायची ते हळूहळू आवडायला लागलं.
आज तीच माझ्या आईची रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे. मला खात्री आहे ती तुम्हालाही फार आवडेल.

ह्या दोन मिनिटात तयार होणाऱ्या मॅगीने मार्केट असं काही हाताळलं की बस्स रे बस्स! ती चक्क ब्रँड नेम झाली. Sunfeast, Top Ramen, Patanjali, अश्या अनेक कंपनी मग मार्केटमध्ये उतरल्या आणि लोक मात्र अमुक कंपनीची "मॅगी" खाल्ली असं अजूनही म्हणतात. ये हुई ना बात! मध्यंतरी मोठं गंडांतर आलं खरं, पण त्यातून धडा घेऊन, सुधारणा करून, नवीन फ्लेवर्स आणून (हो, मीही पूर्वीचा कॅप्सिकाम फ्लेवर वापरला आहे) मॅगीने पुन्हा स्थान मिळवलं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ व्यक्ति
  1. 2पाकिटे कॅप्सिकम फ्लेवरची मॅगी
  2. 3 कपपाणी
  3. 1 लहानकांदा
  4. 1/2खोबऱ्याची वाटी
  5. 1टोमॅटो

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. खोबरे खवून घ्या. मॅगीचे चार तुकडे करून घ्या.

  2. 2

    एका पातेल्यात पाणी उकळले की पाकिटात ला मसाला आणि मॅगी पाण्यात घाला. बरोबर २ मिनिटांनी मॅगी शिजून सर्व पाणी आटलेले असेल.

  3. 3

    शिजल्यावर त्यात खोबरे, कांदा, टोमॅटो यातला निम्मा भाग घालून हलक्या हाताने एकत्र करा.

  4. 4

    आता सर्व्ह करताना वरून उरलेला कांदा, टोमॅटो आणि खोबरे घालून लगेच खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

Similar Recipes