मॅगी कोकोनट करी (थाई फ्लेवर) (maggi coconut curry recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#MaggiMagicInMinutes
#Collab
अनेक वर्षापासून झटपट नाश्ता म्हटला की मॅगी चे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. मॅगी नूडल्स से अनेक प्रकार आपण खाऊन पाहिले आहेत मग त्या साध्या नूडल्स असो किंवा सूपी नूडल्स.. चव छानच लागते. या कॉन्टेस्ट च्या निमित्ताने काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला आणि मग बरेच दिवसापासून डोक्यात असलेली थाई रेसिपी मॅगी बरोबर ट्राय करावी असे वाटले. घरामध्ये नारळाचे दूध सोडले तर थाई रेसिपी साठी लागणारे कोणतेही साहित्य नव्हते, मग आपल्या रोजच्याच घरातल्या वस्तूंचा वापर करून एक थाई रेड ग्रेव्ही बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो कल्पनातीत यशस्वी झाला. प्रथम मला शंका होती की ही रेसिपी कितपत चांगली होईल पण या मॅगी कोकोनट करी चा पहिला चमचा तोंडात घातला आणि नारळाच्या दुधाबरोबर हे कॉम्बिनेशन जबरदस्त लागले. यात नारळाच्या दुधातील गोडवा तर होताच पण थाई रेड करीचा आणि मॅगी मसाल्याचा तिखटपणाही होता. चला तर मग बघुया ही एक आगळीवेगळी रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. मॅगी नूडल दोन पॅकेट(कोणतेही घ्या)
  2. 150 लिटर कोकोनट मिल्क
  3. मॅगी मसाला एक ते दीड पॅकेट
  4. 7-8 लसूण पाकळ्या
  5. 3- 4 सुक्या काश्मिरी मिरच्या
  6. 2 लहानपांढरे कांदे किंवा पातीचे कांदे
  7. 1 लहानभोपळी मिरची
  8. 1मीडियम टोमॅटो
  9. 1 लहानगाजर
  10. मीठ चवीनुसार
  11. 3-4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

15-20मिनिटे
  1. 1

    प्रथम एका छोट्या भांड्यात पाणी घेऊन ते उकळवा आणि त्यामध्ये तीन ते चार सुक्या काश्मिरी मिरच्या दोन ते तीन मिनिटे उकळवून घ्या. त्या थंड झाल्यावर पाण्यातून बाजूला काढून ठेवा. मिक्सर च्या भांड्यात एक छोटा कांदा लसणाच्या, तीन-चार पाकळ्या, टॉमेटो आणि या मिरच्या घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

  2. 2

    परत एका भांड्यात २-३ कप पाणी उकळत ठेवा, पाणी उकळले की त्यामध्ये मॅगी चे दोन पॅकेट घालून दोन मिनिटे छान शिजवुन घ्या नंतर चाळणी मध्ये काढून लगेच त्यावर थंड पाणी घाला. वरती एक ते दीड चमचा तेल घालून सर्व मॅगीला व्यवस्थित लावून घ्या. दीडशे ते दोनशे मिलिलिटर नारळाचे दूध काढून एका बाऊलमध्ये घ्या.

  3. 3

    एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घालून त्यावर उरलेल्या लसूण पाकळ्या बारीक चिरून, एक कांदा,भोपळी मिरची उभी चिरून दोन मिनिटं मोठ्या गॅसवर परतून घ्या. नंतर त्यावर मीठ आणि मॅगी मसाला चे एक पॅकेट घालून व्यवस्थित मिक्स करा. आता या मिश्रणामध्ये निथळून ठेवलेली मॅगी घालून मिक्स करा आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवा.

  4. 4

    त्याच पॅनमध्ये नारळाचे दूध काढून घ्या आणि ते चांगले गरम झाले की त्यामध्ये तयार मिरची, कांदा, लसूण पेस्ट घालून मंद आचेवर एक उकळी आणा. त्यामध्ये गरज असेल तर मीठ आणि तिखट आवडत असेल तर परत थोडा मॅगी मसाला टाका आणि मग बाजूला काढून ठेवलेली मॅगी या नारळाच्या करीमध्ये मिक्स करून एक उकळी काढून घ्या. बाऊलमध्ये ही मॅगी कोकोनट करी गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

Similar Recipes