गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#GA4
#week24
नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.

गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)

#GA4
#week24
नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 2 वाटीगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनअमूल बटर
  3. 2 टीस्पूनलसूण पेस्ट
  4. तेल
  5. कोथिंबीर
  6. मीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून कणिक मळून घ्यावी. दहा मिनिटांसाठी साईडला ठेवावी. एका बाऊलमध्ये अमूल बटर द घ्यावे रूम टेंपरेचर चे मग त्यामध्ये लसून पेस्ट ऍड करावी. मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    गव्हाच्या पिठाचा एक गोळा घेऊन मोठी पोळी लाटून घ्यावी. त्यानंतर आपण तयार केलेले गार्लिक बटर चे मिश्रण त्याच्यावर स्प्रेड करून घ्यावे.त्यानंतर मी फोटो दाखवल्याप्रमाणे सर्व स्टेप्स करावेत.

  3. 3

    अशा पद्धतीने पराठा केल्यामुळे पराठ्यांना छान लेयर्स येतात.

  4. 4

    मग हे व्यवस्थित गोल गुंडाळून त्याचा गोळा करून घेणार आहोत. मग याला थोडेसे पीठ लावून पराठा लाटून घ्यावा व तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप सोडून पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यावा.

  5. 5

    हा झाला आपला गार्लिक पराठा तयार हा नुसता ही छान लागतो किंवा कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही गरमागरम सर्व्ह करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes