पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#पालक पनीर # बहुतेक सर्वांच्या आवडीचे # आज मी तेच पालक पनीर केले आहे . आणि त्या त घरी केलेल्या पनीरचाच वापर केलेला आहे..

पालक पनीर (palak paneer recipe in marathi)

#पालक पनीर # बहुतेक सर्वांच्या आवडीचे # आज मी तेच पालक पनीर केले आहे . आणि त्या त घरी केलेल्या पनीरचाच वापर केलेला आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1पाव पालक
  2. 1 इंचआल्याचा तुकडा
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 3-4लसुन पाकळ्या
  5. 2 टेबलस्पूनबटर
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 10-12पनीरचे तुकडे
  8. 1मोठा कांदा चिरून
  9. 1टोमॅटो चिरून
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1तेजपान
  12. 1/2 इंचदालचिनीचा तुकडा
  13. 2लवंग
  14. 1मोठी वेलची
  15. 1 टीस्पूनतिखट
  16. 1 टीस्पूनधणे पावडर
  17. 1/2 टीस्पूनमसाला
  18. चवीनुसारमीठ
  19. 1 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  20. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  21. गरजेप्रमाणे पाणी
  22. 2 टेबलस्पूनताजे क्रीम

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    पालक निवडून, स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर एका भांड्यात पाणी ठेउन ते उकळावे. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. आपल्याला आपल्याला पालक ब्लांच करायचा आहे.

  2. 2

    पाणी उकळल्यानंतर त्यात पालक टाकुन दोन ते तीन मिनिट ठेवावा. त्यानंतर बर्फाच्या थंडगार पाण्यात गरम पाण्यातील पालक टाकावा.

  3. 3

    आता थंड पाण्यातील पालक काढून मिक्सर च्या भांड्यात पेस्ट करण्यासाठी टाकावा. त्यात हिरवी मिरची आले आणि लसूण टाकावे आणि त्याची पेस्ट करून घ्यावी आवश्यकता वाटल्यास दोन टेबलस्पून पाणी टाकावे. त्यानंतर कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  4. 4

    आता घ्या सुरू करून गॅसवर एका पॅनमध्ये बटर टाकावे. त्यामध्ये तुकडे केलेले पनीर टाकावे. आणि तीन ची सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. आणि बाजूला काढून घ्यावे.

  5. 5

    आता त्याच पॅनमध्ये तेल टाकून त्यात खडा मसाला म्हणजे ते जपान जीरे वेलची दालचिनी टाकावी. किंचीत परतून घेतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा व सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यानंतर त्यात टोमॅटो टाकावे.

  6. 6

    टोमॅटो मिक्स केल्यानंतर त्यात तिखट धणे पावडर आणि मसाला टाकावा. चांगले मिक्स केल्यानंतर त्या त एका बाजूला करून बेसन टाकून किंचित भाजून घ्यावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे.

  7. 7

    त्यानंतर त्यात तयार केलेली पालकाची पेस्ट टाकावी. मिक्स करावे कसूरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकावे.

  8. 8

    आवश्यकतेनुसार ज्यात पालक बारीक केला, तेच मिक्सर चे भांडे धुऊन तेच पाणी टाकावे. आणि मिक्स करून घ्यावे. एक उकळी आल्यानंतर त्यात पनीरचे तुकडे टाकावे व दोन तीन उकळ्या येऊ द्याव्यात. नंतर त्यात ताजे क्रीम टाकावे.

  9. 9

    पुन्हा दोन मिनिट गरम केल्यावर, चवदार पालक पनीर गरमागरम पोळी सोबत खाण्यास तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes