बीटरुट कोशिंबीर (पचड़ी) (beetroot koshimbir recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

#wd वुमन्स डे निमित्त माझी बीट पचड़ी ही खास रेसीपी माझ्या आयुष्यात खास पेक्षा प्राणप्रिय अशी असणारी व्यक्ति माझी आई हिला डेडीकेटेड करत आहे. कारण ही रेसीपी मी माझ्या आई कडून शिकले आणि लहान पाणापासून आवडीने खात आहे. आणि माझी सर्वात आवडती रेसीपी आहे.आणि मी ही बीट पचड़ी आवर्जून करते आणि माझ्या मुलांना आणि घरात सगळ्यांना ही बीट पचड़ी आवडते म्हणुन मी ही बीट पिचड़ी रेसीपी तुम्हा सगळ्याना शेयर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामबीटरूट वाफेवर शिजवलेले
  2. 1 वाटीफ्रेश गोड दही
  3. 1/2 वाटीशेंगदाणा कुट
  4. 1 टेबलस्पूनसाखर
  5. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 1 टेबलस्पूनजीरे
  7. 5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  8. 4 चिमूटहिंग
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका प्लेटमध्ये शिजलेले बीट किसून घ्या आणि किसलेले बीट बाउलमध्ये घाला.आता त्यात शेंगदाणे कुट, साखर, मीठ घालून घ्या

  2. 2

    आता फ्रेश गोड दही बीटाच्या मिश्रणात घालून घ्या

  3. 3

    आता कोथिंबीर घाला आणि तडका बाउलमध्ये साजूक तूप घालावे आता गरम झाल्यावर त्यात जीरे, मिरच्या आणि हिंग घालून खमंग फोडणी करून घ्या

  4. 4

    आता गरम फोडणी बीटाच्या मिश्रणात घाला आणि चांगले मिश्रण चमच्यानी एकजीव करून घ्या

  5. 5

    आता बीट पचड़ी तयार आहे सर्विंग प्लेट मध्ये पोळी,भाजी, वरण, भात बरोबर सर्व्ह करा

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes