कोकणची स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kajuchi usal recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#cf
कोंकण म्हणजे स्वर्ग आणि त्याच कोंकणातील रानमेवा खायला मिळणे म्हणजे भाग्यच....
कोंकणात आंबा, काजू, फणस याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. फेब्रुवारी मार्च आला की ओले काजू यायला लागतात. ओले काजू सोलताना त्याचा चीक हाताला लागून हात खराब होतात.... पण बोलतात ना कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!... तसंच काहीसं..
चवच एवढी भारी असते की हाथ खराब झाले तरी बेहत्तर☺
या काजूच्या उसळ सोबत तांदळाची भाकरी...वाह.
...लायभरी😊
नॉनव्हेज डिश ला पण मागे काढेल अशी ही कोंकणी डिश.
आज मी ही मालवणी रेसिपी बनवली आहे... माझ्या आईने गावावरून पाठवल्या काजूची.....😊😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1 कपओले सोललेले काजू गर
  2. 1 कपबारीक चिरलेला कांदा
  3. 1/2 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1/2 कपवाटण(1/2 कप सुके खोबरे, 1 कांदा, 4-5 लसूण पाकळ्या भाजून)
  5. 2 टीस्पूनमालवणी मसाला
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 5-6कडीपत्ता पाने
  9. 1-1/2 टीस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 कपगरम पाणी
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सोललेले काजूगर10 मिनिटे कोमट पाण्यात ठेऊन त्याला जर कुठे साल असेल तर काढून घ्या. तेल गरम करून त्यात कांदा कडीपत्ता टाका आणि गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या.

  2. 2

    टोमॅटो टाकून परतवा मग त्यात मसाले, पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परतवा. गरम पाणी टाकून त्यात काजू टाका आणि 10 मिनिटे झाकण ठेवून शिजवा.

  3. 3

    काजू शिजले की वाटण आणि मीठ टाकून 5-6 मिनिटे वाफ द्या आणि गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes