ओल्या काजूची भाजी (kajuchi bhaji recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week4 #माझे आवडते
पर्यटन शहर म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला मालवण हे पर्यटन ठिकाण तेथील खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक गोष्टी सांगता येईल उदाहरणार्थ फणस कोकम आंबे नारळ ताडगोळे सुपारी काजु त्या तील मला आवडलेली ओल्या काजूची भाजी ते मिळणार फक्त सिझन नुसार मार्च ते जून या महिन्यात पण ती भाजी खाल्ली व नाव काढले तरी चव ओठांवर येत डोंगरात राहणार्‍या आदिवासी बाया यांची तर कमालच ते कच्च्या बीया तोडून बाजारात विक्रीसाठी ठेवता व सोलून देतात त्या साठी ची फार मेहनत घ्यावी लागते कारण त्याचा चीक उभरतो बीया सोलने कठीण आहे तरी देखील त्या या सिझन मध्ये उपलब्ध करून देणार त्यामुळे मला मालवणला राहत असल्याचे जाणवत असते मला 300 किलोमीटरवर असलेल्या मालवणात जायला पुन्हा पुन्हा आवडेल पण ते नेहमी शक्य नाही म्हणून या रेसिपी केली की मालवणची आठवण करुन खाल्याचे समाधान मानते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्राम ओले काजू
  2. 2कांदे
  3. 1 टि स्पुनमिरची पावडर
  4. 1 टि स्पुनहळद पावडर
  5. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20मि
  1. 1

    बाजारात आशा पद्धती ने काजु मिळता ते स्वच्छ करून त्याचे साल काढून घेतले की धुऊन घ्या कांदा बारीक चिरून घ्यावा

  2. 2

    कढईत तेल गरम करून चिरलेला कांदा घालून परतून झाल्यावर त्यात हळद लाल मिरची पावडर मीठ घालून परतून

  3. 3

    परतलेल्या कांदा मध्ये काजु तुकडे घालून थोडा पाण्याचा शिबका देऊन झाकण ठेवून वाफ येऊ द्या वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे तांदळाच्या भाकरी बरोबर खायला तयार मस्त लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

Similar Recipes