अंडा करी (anda curry recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#cf #अंडा_करी
अंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे.

अंडा करी (anda curry recipe in marathi)

#cf #अंडा_करी
अंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 5अंडी
  2. 2कांदे
  3. 3टोमॅटो
  4. 2 टीस्पूनलसूण पेस्ट
  5. 1 टीस्पूनआलं पेस्ट
  6. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट पूड
  7. 2 टीस्पूनमालवणी मसाला
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनमीठ
  10. 2 टीस्पूनधणे-जीरे पावडर
  11. 2 टीस्पूनबेसन पीठ
  12. 2 टीस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  13. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    अंडी धुवून, उकडून घ्यावी. अंडी उकडताना त्यात चिमुटभर मीठ घालावे म्हणजे अंडी फुटत नाहीत आणि लवकर उकडतात. उकडलेल्या अंड्याची साले काढून त्या अंड्यांना उभ्या चिरा पाडाव्या म्हणजे अंड्याच्या आत पर्यंत मीठ मसाले लागतात.

  2. 2

    पॅनमधे जरासं तेल घालून त्यात थोडे तिखट, मीठ, हळद घालून मग अंडी घालून खरपूस परतून घ्यावे. यामुळे अंडी खूप टेस्टी लागतात.

  3. 3

    कढईत तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतून त्यात तिखट पूड हळद मीठ धणे-जीरे पावडर आणि मालवणी मसाला घालून मिक्स करावे. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतावे. यामुळे करी चवदार चविष्ट बनते.

  4. 4

    मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोच्या फोडी, आणि आलं लसूण घालून पाणी न वापरता प्युरी करुन घ्यावी. ती टोमॅटो प्युरी कांद्यावर घालून चांगले परतावी.

  5. 5

    पॅनमधे जरासं तेल घालून त्यात २ टीस्पून बेसन पीठ घालून खमंग भाजून घ्यावे. आणि ते टोमॅटोच्या ग्रेव्ही मधे घालून चांगले ढवळावे आणि एक वाफ‌ काढावी. यामुळे ग्रेव्ही दाट होते आणि जर टोमॅटो आंबट असेल तर ग्रेव्ही जास्त आंबट लागत नाही.

  6. 6

    ग्रेव्ही मधे थोडे पाणी घालून जरा उकळी आणावी. मग त्यात उकडून फ्राय केलेली अंडी घालावी परत एकदा जरासे उकळावे. यामुळे अंड्यामधे ग्रेव्हीची छान चव उतरते.

  7. 7

    गरमागरम अंडा करी वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खुमासदार अंडा करी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes