साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

#fr
उपवास म्हणजे साबुदाणा हे समीकरण गेली वर्षानुवर्षे इतकं डोक्यात फिट्ट बसलंय की कित्येक वेळा मुद्दाम साबुण्यासाठी उपवास करायचे. कारण साबुदाण्याचे पदार्थ व्हायचे उपवासाच्या दिवशी. काही वर्षांपूर्वीपर्यंत उपवासाचा फराळ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, भूईमुगाच्या शेंगा, भगर भात, दही, बटाटे असे पदार्थ राहायचे. आता त्यातलाच एक उपवासाचा गोड पदार्थ मी बनवलाय तो म्हणजे साबुदाणा खीर. ~ उपवास रेसिपीज कॉन्टेस्ट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपसाबुदाणा
  2. 1/4 लीटरदूध
  3. 1/2 कपसाखर
  4. चिमूटभरकेशर
  5. वेलची पावडर
  6. ओले काजू
  7. बदामाचे काप
  8. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    आदल्या रात्री अर्धा कप साबुदाणा १-२ वेळा पाण्याने धुवून पाण्यात भिजवून ठेवला. किंचित मीठ सुद्धा पाण्यात टाकलं.
    साबुदाणा चांगला आठेक तास पाण्यात भिजवून ठेवला की त्याचा कोणताही पदार्थ बनवा, परफेक्ट झालाच पाहिजे.
    दुसऱ्या दिवशी साबुदाणे छान टमटमीत फुगून वाटीभर होतात.

  2. 2

    ३ हिरव्या वेलची चांगल्या कुटून पावडर करून घेतली. आता ओले काजू मिळतात म्हणून नाहीतर सुकेच काजू वापरते मी. बदाम कातरुन सजावटीसाठी कापं करून घेतली. मनुका आणि बेदाणे पाण्यात भिजत ठेवले.

  3. 3

    एका भांड्यात अर्धा कप पाणी उकळायला ठेवलं. एक उकळी आली की त्यात पाव लिटर दुध ऍड केलं. दूध उतू जाऊ नये म्हणून एकसारखं ढवळत राहावं लागतं, म्हणजे थोड्या वेळात ते आटायला सुरुवात होते.

  4. 4

    २-३ उकळी येऊन गेल्या की ५-६ केशर चे दांडे टाकायचे म्हणजे दुधाला छान पिवळसर केशरी रंग चढायला सुरुवात होते.
    आता एखाद उकळीनंतर अर्धा कप साखर किंवा आपल्या आवडीप्रमाणे जेवढं गोड हवं तेवढी साखर ऍड करावी. साखर विरघळली की पाणी निथळून भिजवून ठेवलेलं साबुदाणे ऍड करायचे. अर्धा सुका मेवा या मिश्रणात घालायचा आणि मिश्रण चांगलं एकजीव होऊन थोडंस आटले की गॅस बंद करून थंड करत ठेवायचे. साबुदाणा खीर तयार.

  5. 5

    आता ही खीर तुम्ही रूम temperature ला आलेली खाऊ शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवून थंड करून, उरलेल्या सुक्या मेव्याने garnish करून जेवणानंतर च dessert म्हणूनही एन्जॉय करू शकता 😊🤤

    #fr #साबुदाणा खीर
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes