"मऊसूत आणि टेस्टी दही वडा" (dahi vada recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cooksnap
#लता धानापुने
मी लता ताईंची दहिवडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान मऊसूत आणि टेस्टी दही वडा झाला. लता ताई खूप छान ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद🙂🙏. सगळ्यांना हा दही वडा खूप आवडला.

"मऊसूत आणि टेस्टी दही वडा" (dahi vada recipe in marathi)

#cooksnap
#लता धानापुने
मी लता ताईंची दहिवडा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान मऊसूत आणि टेस्टी दही वडा झाला. लता ताई खूप छान ही रेसिपी पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद🙂🙏. सगळ्यांना हा दही वडा खूप आवडला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपउडीद डाळ
  2. 1/2 लिटरदही
  3. 1-2हिरवी मिरची
  4. 1 टीस्पूनखिसलेले आले
  5. कोथिंबीर
  6. चवीनुसारमीठ
  7. चवीनुसारसाखर
  8. 2-3 टीस्पूनजीरे पूड वरून घालण्यासाठी
  9. 2-3 टीस्पूनलाल तिखट वरून घालण्यासाठी
  10. चिंचेची चटणी (आवश्यकतेनुसार)
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम उडीद डाळ 2-3 वेळा स्वच्छ धून ती 3-4 तास भिजत ठेवावी. तोपर्यत घट्ट दही छान रवी ने फेटून घेणे. दही खूप पातळ करू नये. आता त्या मध्ये चवीनुसार साखर, थोडे से मीठ घालावे. थोडी कोथिंबीर आणि खिसलेले आले घालावे. व सगळे एकत्र करून फ्रिज मध्ये ठेवावे. मस्त थंड होते.

  2. 2

    आता भिजलेली डाळ घेणे. त्या तील सगळे पाणी निथळून काढणे. व ही डाळ मिक्सर मधून थोडी थोडी घेऊन पाणी न घालता बारीक वाटून घेणे. आता ही वाटलेली डाळ छान डावाने 10 मिनिटे फेटून घेणे. डाळ फेटली कि ती खूप हलकी होते. याने वडे ही छान होतात.डाळ हलकी झाली कि नाही ते पाहण्यासाठी एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्या मध्ये अगदी छोटा गोळा घालावा. हा गोळा वर तरंगून आला तर बॅटर हलके झाले आहे असे समजावे.

  3. 3

    आता या मध्ये हिरवी मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून हलवून घेणे.10 मिनिटे बाजूला ही डाळ ठेवणे. आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तळण्यासाठी तेल घालावे.

  4. 4

    आता हाताला थोडे पाणी लावून या बॅटर चे छोटे छोटे वडे तेला मध्ये सोडावे. किंवा चमच्याने ही हे वडे घालू शकता. आता हे वडे दोनीही बाजूने मध्यम आचेवर तळून घेणे. (डाळ खूप आधी वाटून ठेवू नये. नाहीतर वडे तेल खूप शोषून घेतात. अगदी करायच्या वेळेस डाळ वाटून 5 मिनिट लगेचच वडे तळून घेणे.)

  5. 5

    अशाप्रकारे लागेल तसे वडे तळून घेणे. आता एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्या मध्ये जसे लागेल तसे वडे त्यात 2-3 मिनिटे भिजू देणे. मग त्या तील जास्तीचे पाणी हाताने वडा अलगद दाबून काढून टाकावे. व प्लेट मध्ये ठेवावे.

  6. 6

    आता या प्लेट मध्ये आवडीप्रमाणे दही, जीरे पूड, लाल तिखट, चिंचेची चटणी व कोथिंबीर घालून दही वडा सर्व्ह करावा. मस्त दही थंड असल्या मुळे आजून टेस्टी लागतो दही वडा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes