तुरीच्या घुगऱ्या (toorichya ghughrya recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#KS3
#विदर्भ
विस्मरणात गेलेली पारंपारिक विदर्भातील रेसिपी ती म्हणजे *तुरीच्या घुगऱ्या*.. बर्‍याच लोकांना घुगर्या म्हणजे काय हे माहितही नसेल कदाचित...
विदर्भात बऱ्याच घरी ही रेसिपी बनवली जाते. विदर्भामध्ये तुरीचे पीक हे भरपूर प्रमाणात होते. याच तुरी वाळून घुगर्या केल्या जातात... पौष्टिक युक्त, प्रोटीन युक्त असलेल्या या घुगर्या चवीला खूप छान लागतात...
चला तर मग करू या काळाच्या ओघात चाललेली गावाकडच्या पद्धतीने बनवलेली वाळलेल्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजेच *घुगऱ्या*.... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1/2 कपवाळलेल्या तुरीची दाणे (घुगर्या)
  2. 1कांदा चिरलेला
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  5. थोडीशी कोथिंबीर
  6. 4-5कढीपत्त्याची पाने
  7. 1 टेबलस्पूनआले लसुण कोथिंबीर पेस्ट
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1/2 टेबलस्पूनजीरे पावडर, धने पावडर
  10. 2 टेबलस्पूनखोबराकिस
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  13. 3-4 टेबलस्पूनतेल
  14. 1/2 टीस्पूनमोहरी
  15. मीठ चवीनुसार
  16. गरम पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    वाळलेले तुरीचे दाणे म्हणजेच घुगऱ्या आदल्या दिवशी रात्री सात ते आठ तास भिजू घालाव्यात.

  2. 2

    टोमॅटो,कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, खोबरा कीस, कांदा मिक्सरच्या पॉटला लावून बारीक वाटण तयार करून घ्यावे. तसेच आले लसूण कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    कुकर मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की, त्यात मोहरी घालावी. मोहरी चांगली तडतडली की, त्यात कढीपत्ता घालावा व तयार केलेला मसाला घालावा. एक मिनिट मसाला परतून घ्यावा. त्यानंतर त्यात आले लसणाची पेस्ट घालावी.

  4. 4

    आता यामध्ये तिखट, मीठ, धने पावडर, जीरे पावडर, हिंग घालून चांगले मिक्स करावे व तेल सुटेपर्यंत हा मसाला होऊ द्यावा.

  5. 5

    मसाला चांगला शिजल्यानंतर त्यात घुगऱ्या घालाव्यात. चांगले मिक्स करून घ्यावे. एक मिनिट होऊ द्यावे. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालावे. (पाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करु शकता.) गरम मसाला घालावा.

  6. 6

    कुकरचे झाकण लावून चार शिट्ट्या येईस्तोवर घुगर्या शिजवून घ्याव्यात.

  7. 7

    तयार आहे आपली तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजेच घुगऱ्या...
    ह्या घुगऱ्या तुम्ही पोळी सोबत, भातासोबत खाऊ शकता किंवा कच्चा चिवडा सोबत सुद्धा अप्रतिम लागतात आणि त्याहीपेक्षा गरमागरम पोह्या सोबत देखील भन्नाट लागतात. किंवा त्यावरती बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बारीक शेव घालून नुसतीच खाऊन यांचा आस्वाद घेऊ शकता....
    तेव्हा नक्की ट्राय करा *तूरीच्या घुगऱ्या*.... 💃 💕

  8. 8

    टिप.. तुम्हाला जर अगदीच कोरड्या घुगऱ्या हव्या असतील तर पाणी घुगऱ्या शिजतील एवढेच घाला. आणि जर का रस्सा हवा असेल तर थोडे जास्त पाणी घाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

Similar Recipes