तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#GA4
#week13
#Tuvar
विदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...
या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....
पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋
चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕

तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)

#GA4
#week13
#Tuvar
विदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...
या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....
पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋
चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. २५० ग्राम तुरीच्या शेंगा
  2. 1टमाटर
  3. 1कांदा
  4. 6-7लसूण पाकळ्या
  5. 6-7कढीपत्ताची पाने
  6. 1/2 कपकोथिंबीर चिरलेली
  7. 1 टेबलस्पूनतिखट
  8. चवीनुसारमीठ
  9. 5-6 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टिस्पुनधनेपावडर, जिरापावडर, हिंग, मोहरी
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. पातीचा कांदा बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    तुरीच्या शेंगाचे दाणे काढून घ्या. लोखंडी तव्यावर हे दाणे थोडे भाजून घ्या. थोडे भाजल्यानंतर त्यात अर्धा टेबलस्पून तेल घालून परत एकदा चांगले भाजून घ्या. (असे केल्याने त्यातील कच्चेपणा निघून जातो. आणि दाणे भाजून घेतल्याने आमटीला वेगळी चव येते.)

  2. 2

    टमाटर व मिरची देखील गॅस वरती ठेवून भाजून घ्या.

  3. 3

    आता भाजलेले दाणे मिक्सर मधे घालून जाडसर बारीक करून घ्या. तसेच टमाटर, मिरची, कांदा, कढीपत्ता याची देखील जाडसर पेस्ट करून घ्या.

  4. 4

    एक पसरट पॅन घ्या. त्यामध्ये तेल घालून गरम होऊ द्या. तेल चांगले तापले कि त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की त्यात पातीचा कांदा व आले-लसूण पेस्ट घालून दोन मिनिटे परतून घ्या.

  5. 5

    त्यानंतर त्यात तिखट, धनेपावडर, जिरापावडर, हिंग, मिरची, टमाटर ची केलेली पेस्ट घालून, चांगले मिक्स करून एक मिनिटे परतून घ्या.

  6. 6

    आता बारीक केलेली तुरीच्या दाण्याची भरड घाला. दोन मिनिटे चांगले शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घाला. (पातळ होण्या इतपत पाणी घालणे) गरम मसाला, मीठ घालून उकळी काढून घ्या.

  7. 7

    उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालून गरमागरम पोळी सोबत किंवा भाता सोबत सर्व्ह करा तुरीच्या दाण्याची आमटी... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes