काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#काकडीचेधिरडे
सकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕

काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)

#काकडीचेधिरडे
सकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1 कपगव्हाची कणीक
  2. 1/4 कपतांदूळाचे पिठ
  3. 1काकडी किसलेली
  4. 1कांदा बारीक चिरलेला
  5. 1-2 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  6. 7-8हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 6-7कढीपत्ताची पाने
  9. आवश्यकतेनुसार पाणी
  10. कोथिंबीर थोडीशी
  11. 1 टीस्पूनहिंग, धनेपावडर, जिरापावडर
  12. मीठ चवीनुसार
  13. 5-6 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य रेडी करून ठेवावे. काकडी किसून, कांदा चिरून घ्यावा.

  2. 2

    दोन्ही पिठे एकत्र करून, तेल सोडून, वरील सर्व साहित्य घालावे. व चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    आता यामध्ये आवश्यकतेनुसार हळू हळू पाणी घालून, बॅटर दोस्याच्या पिठासारखे पातळ करावे.

  4. 4

    नॉनस्टिक पॅन घेऊन, त्यावरती थोडे तेल लावून घ्यावे. नंतर तव्यावर चमच्याने हे पीठ घालून हलक्या हाताने गोल गोल फिरवावे. वरती झाकण ठेवून एक मिनिट होऊ द्यावेत.

  5. 5

    दुसऱ्या बाजूने पण पलटवून छान खरपूस शेकून घ्यावे व प्लेटमध्ये काढून, दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत गरमागरम सर्व्ह करावे *काकडीचे धिरडे*.... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes