झणझणीत नागपुरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#KS3
काय सांगावं या डिश बद्दल हेच कळेना....नुकतेच खाऊन संपले आणि रेसिपी लिहायला घेतली....जे कोणी वाचत असाल ही रेसिपी त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा...खूपच अल्टिमेट झालेली...सगळं प्रमाण अगदी बरोबर आणि balance आहे...मासालाच्या परफेक्ट blend आणि balance ...spice level proper..protein आणि iron rich अशी recipe आहे...must must try..😋😋😋( मी iron पॅन मध्ये केले होते)

झणझणीत नागपुरी तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

#KS3
काय सांगावं या डिश बद्दल हेच कळेना....नुकतेच खाऊन संपले आणि रेसिपी लिहायला घेतली....जे कोणी वाचत असाल ही रेसिपी त्यांनी नक्की ही रेसिपी ट्राय करा...खूपच अल्टिमेट झालेली...सगळं प्रमाण अगदी बरोबर आणि balance आहे...मासालाच्या परफेक्ट blend आणि balance ...spice level proper..protein आणि iron rich अशी recipe आहे...must must try..😋😋😋( मी iron पॅन मध्ये केले होते)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिन
३-४ लोक
  1. 3-4 कपमध्यम पोहे
  2. 1 कपकाळे हरभरे किंवा चणे
  3. 3कांदे
  4. 4 टेबलस्पूनसुख खोबरं.
  5. 1टोमॅटो
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 3 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 1मोठा लिंबू
  9. 5-6लवंगा
  10. 5-6काळी मिरी
  11. 3-4हिरवी वेलची
  12. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  13. 2तमालपत्र
  14. 2 टीस्पूनजीरे
  15. 1 टीस्पूनमोहरी फोडणीसाठी कडीपत्ता
  16. 2 टीस्पूनहळद
  17. 1 टीस्पूनसाखर
  18. 4-5 टीस्पूनलाल तिखट
  19. 2-3 टीस्पूनकाळा गरम मसाला
  20. 2 टीस्पूनगोडा मसाला
  21. 5-6 कपगरम पाणी
  22. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  23. मीठ चवीनुसार
  24. 7-8 टेबलस्पूनतेल(तर्री साठी तेल जास्तच घ्यावे)

कुकिंग सूचना

४५ मिन
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ करून धुवून निथळून घ्यावेत.आणि रात्रभर भिजवलेले हरभरे कुकर मधून थोड मीठ घालून उकडून घ्यावेत..

  2. 2

    प्रथम पोह्यांसाठी कांदा, मिरची, कोथिंबीर, लिंबू चिरून याची पूर्व तयारी करून घ्यावी..

  3. 3

    आता पोह्याला फोडणी देण्यासाठी पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यावे त्यात मोहरी घालावी.. ती तडतडली की त्यात शेंगदाणे थोडे परतून त्यात १ कांदा चिरलेला आणि मिरची, कडीपत्ता घालून थोड परतावे..मग त्यात हळद आणि साखर घालवी आणि थोड परतून भिजवून घेतलेले पोहे, मीठ घालून छान परतावे...आणि बाजूला काढून ठेवावे..

  4. 4

    तयार पोहे एका पातेल्यात काढून घेणे..

  5. 5

    आता गॅस वर एका पॅन मध्ये १ चिरलेला कांदा घेऊन थोडा परतून त्यात सुख खोबरं किंवा डेसिकॅटेड कोकोनट घालावे..मी डेसिकॅटेड कोकोनट वापरले आहे..त्यात सगळे खडे मसाले घालवेत..(वेलची, लवंग, मिरी, जीरे) आणि सगळं चांगलं मध्यम आचेवर परतून घ्यावे..आणि हे मिश्रण मिक्सर मध्ये काढून याची पेस्ट करून घ्यावी..

  6. 6

    आता एका मोठ्या कढयीत भरपूर तेल तर्रिसाठी घेऊन त्यात जीरे आणि तमालपत्र, दालचिनीचा एक तुकडा घालून मध्यम आचेवर थोड परतून त्यात मिक्सर वर वाटलेले वाटण घालावे..थोड परतावे..आता त्यात लाल तिखट, हळद, गोडा मसाला, काळा गरम मसाला हे सगळं घालून छान परतून मग..त्यात ४ ग्लास गरम पाणी घालावे..एक उकळी काढून त्यात शिजवलेले चणे घालून चांगली उकळी काढावी.मस्त पैकी कट आलेला दिसेल..त्यात वरून मीठ आणि कोथिंबीर आणि मोठे मोठे टोमॅटोचे तुकडे घालावेत..

  7. 7

    जबरदस्त तर्री तयार झालेली आहे...त्याला अजून जरा उकळून छान कट आणून घ्यावे..आणि ही गरमगरम तर्री पोह्यांवर घालून ताव मारावा..😜😜😆😆

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes