थंडगार मठ्ठा (matha recipe in marathi)

Ashvini bansod @AshviniBansod
नमस्कार या आठवड्यातील ट्रेडिंग रेसिपी मधली एक मठ्ठा हि रेसिपी मि पोस्ट करतेय...थंडगार चवीला टेस्टी असा मठ्ठा नक्की करून बघा.....
थंडगार मठ्ठा (matha recipe in marathi)
नमस्कार या आठवड्यातील ट्रेडिंग रेसिपी मधली एक मठ्ठा हि रेसिपी मि पोस्ट करतेय...थंडगार चवीला टेस्टी असा मठ्ठा नक्की करून बघा.....
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका पातेल्यात दही घ्यायचे त्याला छान घोळून घ्यायचे
- 2
नंतर तव्यावर हिरवी मिरची आणि जीरे भाजून घ्यायचे आहे
- 3
भाजलेले जीरे व मिरची मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आणि त्यात साखर आणि कोथिंबीर टाकून पून्हा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे
- 4
सगळे घटक बारीक झाल्यावर घोळलेल्या दह्यात टाकायचे आणि वरून मीठ घालून छान एकजीव करून घ्यायचे आहे
- 5
10 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवायचे
- 6
थंड झाल्यावर सर्व्ह करायचे थंडगार मठ्ठा तयार... 🤗🤗🤗
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
थंडगार मठ्ठा
#पेयउन्हाळ्यामध्ये थंडगार मठ्ठा प्यायला न आवडणारा माणूस विरळाच....पूर्वी लग्नकार्यात जीलेबीचे जेवण असेल की सोबत मठ्ठा हमखास असायचाच.... Preeti V. Salvi -
मठ्ठा (matha recipe in marathi)
# Shobha Deshmukh उन्हाळयात थंडगार मठ्ठा सर्वांनाच आवडतो. माझ्या मुलाला तर मठ्ठा खुप आवडतो व त्या मधे २ लसुन ठेचुन टाकलेले छान लागते , हे त्यालाच आवडते. गारलीक मठ्ठा. Shobha Deshmukh -
-
स्मोकी मटर पनीर लसूणी (matar paneer bhaji recipe in marathi)
फेसबूकच्या एका ग्रूपवरिल बल्लवाचार्यानी हि पोस्ट टाकली आणि बनवून पाहीले एक वेगळीच रेसिपी. टेस्टी. बोट चाटाल अशी पण काही शी झनझनीत. व्हेज आणि झणझणीत हवे असल्यास हि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. Supriya Devkar -
मठ्ठा (matha recipe in marathi)
#वीक ट्रेडिंग रेसिपीउन्हाळ्यात दुपारच्या जेवणात आपण नक्कीच बनवतो शरीराला थंड गार कधी तो जेवणानंतर पिला जातो कधी तो जिलेबी बरोबर खाल्ला जातो असा हा मठा सर्वांचा आवडीचा याची रेसिपी मी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
ओट्स मठ्ठा (ताक) (oats mattha recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स मठ्ठा करून पाहिला खुप छान चविष्ट मठ्ठा आहे Vaishnavi Dodke -
बुंदी मठ्ठा (boondi mattha recipe in marathi)
#GA4 #Week1#curd(दही)गोल्डन अप्रोन साठी दिलेल्या puzzle मध्ये मी curd (दही )सिलेक्ट केलं. आणि मस्त थंडगार मठ्ठा बनवला. बुंदी मठ्ठा साठी लागणारी बुंदी मी घरी बनवली. Roshni Moundekar Khapre -
विदर्भातील मठ्ठा / फोडणीचे ताक (phodnicha taak recipe in marathi)
#KS3विदर्भातील हा मठ्ठा म्हणजेच फोडणीचे ताक.चवीला फार रूचकर लागते हे ताक .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रताळ्याचे कटलेट रेसिपी या साप्ताहिक मधली मी दुसरी रेसिपी पोस्ट करत आहे. रताळ्याचे कटलेट हे उपवासला ही चालतील अशी खमंग खुसखुशीत कटलेट खूप टेस्टी लागतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यातली लग्न...मेन्यूमध्ये मसालेभात,बटाट्याची भाजी,भजी,काकडी कोशिंबीर, जिलेबी आणि "मठ्ठा"!येणारे पाहुणे कितीही असोत शेवटच्या माणसापर्यंत मठ्ठा पुरवायचे काम आचाऱ्याचे!भलं मोठं पिंप...त्यात दही घुसळलेलं ताक,बर्फाची लादी,आलं-मिरची वाटण,मीठ,साखर, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.... प्रत्येक पंक्तीत मोठ्याश्या ओगराळ्याने वाटीत मठ्ठा वाढलेला....मस्त पाकात मुरलेली केशरयुक्त जिलेबी मठ्ठ्याबरोबर खाणं म्हणजे जिव्हातृप्ती...आत्मा थंड!कितीही करायचं म्हणलं तरी या तमाम आचाऱ्यांसारखा मठ्ठा मात्र जमायला फार तपश्चर्या लागते!दिसायला साधासाच पांढरा शुभ्र मधेमधे कोथिंबिरीची हिरवी पखरण... मठ्ठ्याची ती गोडी,तो आंबटपणा,बेताचंच खारट,थंडगार,नुसतं वासापुरतं आलं पण चव मात्र मेंदूपर्यंत जाणारी...अधेमधे येणारी कोथिंबिरीची पानं थोडीशी चावून खाणं...आणि असा मठ्ठा वाट्यांवर वाट्या रिचवणं,यानेच तहान भागवणं हे खरं उन्हाळ्यातलं सुख!पेशवेकाळापासून मठ्ठ्याचा उल्लेख सापडतो...खरं म्हणजे ताक हे क्षुधाशांती करणारं,अन्नपचनास मदत करणारं....अगदी पंक्तीतच हवं असं काही नाही...दुधाच्या दह्याचा मठ्ठ्याइतका बहुगुणी पदार्थ उन्हाळ्यात तर करायलाच हवा...घरी बनवलेला.जीरेपूड वगैरे टेस्टएनहान्सर म्हणूनही वापरु शकतो...तरीही मला मात्र तो आचाऱ्यांचाच मठ्ठा भारी आवडतो...फारसं नटवणं नसतं तरी ती भन्नाट चव उन्हाची काहिली शमवते हे मात्र खरं! आजचा हा माझा प्रयत्न घरीच मठ्ठा बनवण्याचा!👍जमलाय आई तुला...अशी पावती मिळालीये...बघा तुम्हीपण चव घेऊन,🤗😋😋🌱☘️🥛☘️🌱 Sushama Y. Kulkarni -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#GA4 #week7जून्या जमान्यात लग्नाच्या पंगतीच्या पंगती उठत. लग्नातला मेनूही ठरलेला असे. त्यात मुख्य वर्णी असे ती म्हणजे मसाले भात , जीलबी आणि मठ्ठा. असा हा काळाच्या पडद्याआड गेलेला मठ्ठा आज मी केला आहे. कीवर्ड बटर मिल्क. Ashwinee Vaidya -
मठ्ठा (mattha recipe in marathi)
मठ्ठा म्हणजेच मसाला ताक पाचक आसे पेय.जेवणा सोबत किंवा जेवल्यावरही पिऊ शकतो. Ranjana Balaji mali -
मठ्ठा (mathha recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रपश्चिम भारत रेसिपीजताक, ताका पासून होणारा मठ्ठा हा अत्यंत पाचक समजला जातो. उन्हाळ्यात तर खूप थंडावा देतो. अपचन, पोटाचे विकार, ऍसिडिटी, या सारख्या आजारांवर गुणकारी मानला जातो.तसेच महाराष्ट्रात लग्न सोहोळा, किंवा शुभ कार्य काही असले की जेवणा मध्ये आवर्जून मठ्ठा हा असतोच. त्यात बरेच जण खरी बुंदी पण घालतात थोडी.मठ्ठा ची रंगत वाढव्हायला त्या बरोबर जर जिलेबी, मसाले भात आवर्जून केला जातो. Sampada Shrungarpure -
मठ्ठा (mathha recipe in marathi)
#GA4#week 7या आठवड्यात buttermilk ताक हा key word वापरून मठ्ठा ही रेसिपी केली आहे.ताक पिण्याचे अनेक फायदे आपण जाणतोच.गोड जेवण असलं की मठ्ठा हवाच.त्याच आयुर्वेदिक अंगानेही योग्य आहे जड अन्नाचे पचन यामुळे होते त्यामुळे साधी वाटली तरी गरजेची आणि कालपरत्वे मागे पडलेली ही रेसिपी. Pallavi Apte-Gore -
-
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रआपल्या महाराष्ट्रीयन थाळी मधला अविभाज्य घटक म्हणजे मठ्ठा आणि माझा फेवरेट आहे. म्हणून मठ्ठा रेसिपी बघूया. Suvarna Potdar -
स्वीट कॉर्न वडा (Sweet Corn Vada Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपीझटपट होणारा टेस्टी असा वडा आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोहळ्याच्या सालाची भूर्जी (kohalyachya salachi bhurji recipe in martahi)
नमस्कार friends, आज मी ऐक वेगळी अशी कोहळ्याच्या सालाची भूर्जी बनवलेली आहे तशी हि रेसिपी कूनाला माहिती असेल वा नसेल सणासुदीला आपन कोहळ्याचे गोड भजे (म्हणजे बोंड पन म्हनतात ) करतो त्याचेच सालीची हि भूर्जी माझी आई बनवायची तेच मि पन शिकले चलातर कमी साहित्यात झटपट होणारी अशी रेसिपी बघा आणि आवडली तर करून बघा... Ashvini bansod -
-
ताकाचा मठ्ठा (Taakacha Mattha Recipe In Marathi)
ताकाचा मठ्ठा हा पारंपरिक पदार्थ उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. आंबट- गोड मठ्ठा Sukhada Rao -
पाचक हरित मठ्ठा (Mattha recipe in marathi)
दहीची रेसिपी ,कूकस्नॅप उन्हाळ्यात घरोघरी मठ्ठा होतो . पाचक आलं , थंडाई साठी जीरे , खडीसाखर व हिरव्या मसाल्यांचं बहुगुणी ताक !! कार्याच्या पंक्तीत हमखास हजेरी लावणारा पाचक मठ्ठा ........ पंक्तीत हमखास हजेरी लावणारा पाचक मठ्ठा ........ Madhuri Shah -
ब्रेकफास्ट युनिक पोटॅटो नाष्टा /पोटॅटो स्टफ रोल (potato stuff roll recipe in marathi)
युनिक असा पोटॅटो स्टफ रोल. बटाट्याचा हा नाष्टाचा एक प्रकार आहे. चवीला एकदम भन्नाट लागतो. नक्की तुम्ही करून पहा.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
"पनीर पुदिना पराठा" (paneer pudina paratha recipe in marathi)
#GA4#week_1#keyword_पराठा पोटभरीचा पौष्टिक असा टेस्टी टेस्टी पराठा... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)
#BBS#मठ्ठा... लग्नाच्या पंक्तीमध्ये स्पेशल स्थान असलेल्या हा मठ्ठा मसाले भात आणि जिलबी हे कॉम्बिनेशन ठरलेलं असतं...आणी गरमीच्या दिवसात हे पेय शरीराला अतीशय थंडावा देऊन जात... Varsha Deshpande -
गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)
#ngnrचवीला अप्रतिम असा गोपाळकाला कधी कधी मुलांना मधल्या वेळेत खायला उत्तम पदार्थ आहे आणि पौष्टिक ही...असा हा गोपाळकाला नक्की करून बघा . Shital Muranjan -
लौकी पराठा (lauki paratha recipe in marathi)
#paratha#bottlegaurd#dudhibhopla#laukiनिरोगी आणि पौष्टिक अशी हि रेसिपी आहे चवीला खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा चविष्ट आणि आरोग्याला परिपूर्ण Payal Nichat -
शिल्लक भाताची इडली (Rice Idli recipe in Marathi)
शिल्लक राहिलेल्या भाताच्या मी तशा बर्याच रेसिपी कुकपॅड वरती अपलोड केलेली आहे त्या मधली ही अजून एक रेसिपी...शिल्लक भाताचे खुसखुशीत इडली नक्की करून बघा.... Prajakta Vidhate -
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
मसाला ताक/मठ्ठा (Masala Taak Recipe In Marathi)
#PBR मसाला छास म्हणजेच मसाला ताक किंवा मठ्ठा हा प्रकार पंजाब मध्ये ही बनवला जातो अगदी सोप्या पद्धतीने छास बनवले जाते पंजाब मधील लोक हे धिप्पाड असल्याकारणाने दोन ग्लास देखील हे ताक एका वेळी ते पिऊ शकतात . Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15064371
टिप्पण्या