रेस्टॉरंट स्टाईल दम आलू (dum aloo receipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#rr

रेस्टॉरंट स्टाईल दम आलू (dum aloo receipe in marathi)

#rr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
पाच जणांना
  1. 1/2 किलोछोटे बटाटे
  2. 2तमालपत्र
  3. 2मोठी दालचिनी
  4. 1मसाला वेलची
  5. 4हिरव्या वेलच्या
  6. 8-10 मिरी
  7. 1 टेबलस्पूनजीरे
  8. 1/2 चमचाहळद
  9. 1 चमचालाल तिखट
  10. 2 चमचेकाश्मिरी लाल तिखट
  11. 1 चमचाजीरे पावडर
  12. 1 चमचाधणे पावडर
  13. 1 चमचागरम मसाला
  14. 1/2 चमचाआमचूर पावडर
  15. 4लाल मिरच्या
  16. 2हिरव्या मिरच्या
  17. 2 इंचआले
  18. 10-12 लसूण पाकळ्या
  19. 4कांदे
  20. 3मोठे टोमॅटो
  21. 2 टेबलस्पूनक्रीम
  22. कोथिंबीर सजावटीसाठी
  23. 10 -15 काजू
  24. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याला फोर्कने टोचे मारून कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी मारावी. बटाटे शिजले की गार करून द्यावेत.

  2. 2

    एक कढई घेऊन त्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर बटाटे लालसर रंगावर तळून काढावेत.

  3. 3

    त्याच कढईत परत तेल घालून त्यात उभा चिरलेला कांदा, लाल मिरची,लसूण,आलं आणि काजू परतून घ्यावे कांदा परतून गुलाबीसर झाला कि त्यात टोमॅटो बारीक चिरलेले टोमॅटो घालावेत त्यात थोडंसं मीठ घालावं म्हणजे टोमॅटो आणि कांदा लवकरच शिजतात.

  4. 4

    टोमॅटो शिजला कि एका ताटलीत काढून सर्व मिश्रण गार करायला ठेवावे,गार झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करावी.

  5. 5

    आता आता एक कढई घेऊन त्यात तेल गरम करून त्यात खडा मसाला म्हणजेच दोन तमालपत्र, दालचिनी,काळी मिरी, जीरे घालून एक मिनिट परतून घ्यावे मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट घालावी.

  6. 6

    तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे मग त्यात मसाले घालून चवीपुरते मीठ घालून परत एकदा ढवळून घ्यावे ग्रेव्ही घट्ट वाटली तर त्यात थोडे पाणी घालावे. एक उकळी आल्यावर त्यात तळलेले बटाटे घालावेत.

  7. 7

    मग त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी आणि एकदा परत दोन मिनिटे परतावे. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. वरून थोडे डेकोरेशन साठी क्रीम घालावे.

  8. 8

    आणि गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes