उब्जे (ubje recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#KS7 विस्मृतीत गेलेले पदार्थ करायच्या निमित्ताने पदार्थ आठवता आठवता आजी करायची तो पदार्थ आठवला. मग काय लागले तयारीला आणि केले उब्जे. मला लहानपणी खूप आवडायचे आणि आत्ताही खायला आवडतात. पण पिझ्झा, बर्गर, चायनीजच्या जमान्यात हे पदार्थ खरच लोप पावत चालले आहेत. नक्की करुन बघा हा पदार्थ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनीटं
५ सर्व्हिंगज
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 3/4 वाटीचणाडाळ
  3. 3 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनजिरं
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 7-8कढीपत्त्याची पानं
  9. 2हिरव्या मिरच्या
  10. कोथिंबिर आवडीप्रमाणे
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

४० मिनीटं
  1. 1

    चणाडाळ रात्री भिजत घालावी. आणि सकाळी अर्धवट वाटून घ्यावी.

  2. 2

    एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी,जिरं,हळद,हिंग,मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी.

  3. 3

    आता तांदूळ धुवुन फोडणीला घालावे. आणि पाण्याचे हबके देऊन बोटचेपी होईपर्यंत शिजवावे. मग त्यात वाटलेली चणाडाळ घालावी आणि एकत्र करुन परतावे.

  4. 4

    आता थोडे पाणी घालून झाकण ठेऊन व्यवस्थित शिजवून घ्यावे. संपूर्ण शिजल्यावर त्यात मीठ आणि कोथिंबिर घालून मिक्स करणे. गरमागरम खायला तयार उब्जे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes