मटार भात (matar bhat recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#EB8 #W8 थंडीमधे भाज्यांची रेलचेल असते. शिवाय भाज्यांना चवही छान असते. त्यामुळे कमी साहित्य वापरलं तरीही पदार्थ छान लागतात. असाच एक सोपा पदार्थ म्हणजे मटारभात. एखादवेळी खूप काही करण्याचं मन नसतं त्यावेळी पटकन हा भात होऊ शकतो. किंवा अचानक पाव्हणे आले आणि मटार घरात असतील तर नक्कीच पाव्हण्यांना खुश करायला हा एक सोपा आणि पटकन होणारा भात आहे.
तुम्ही पण नक्की करुन बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनीटं
५ सर्व्हिंगज
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपसोललेले मटार
  3. 2 टीस्पूनपुलाव मसाला
  4. 3 टीस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनजिरं
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. चवीनुसारमीठ
  8. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

४५ मिनीटं
  1. 1

    प्रथम तांदूळ आणि मटार स्वच्छ धुवुन घ्यावेत. आता कुकरमधे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं,हिंग घालावं. मग त्यात मटार घालून परतावे.

  2. 2

    आता धुतलेले तांदूळ घालून २ ते ३ मिनीटं परतावे. मग त्यात पुलाव मसाला घालावा आणि मिक्स करुन घ्यावे.

  3. 3

    आता आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि सर्व नीट एकजीव करावे. मग त्यात मीठ घालावे आणि ढवळून कुकरचे झाकण लावून शिट्टया होऊ द्याव्या. कुकर उघडल्यावर गरमागरम मटार भात सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes