व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

#br

व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)

#br

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीबासमती तांदूळ
  2. 2कांदे
  3. 1गाजर
  4. 3/4 वाटीफरसबी
  5. 1 वाटीफ्लॉवर चे मोठे तुकडे
  6. 1तमालपत्र
  7. 2छोटे दालचिनी तुकडे
  8. 4लवंग
  9. 4वेलदोडे
  10. 1मोठी वेलची
  11. 1चक्रीफुल
  12. 1 टीस्पूनशहाजिरे
  13. 1 टेबलस्पूनआल्याची पेस्ट
  14. 1-1/2लसुन पेस्ट
  15. 2 टीस्पूनलाल तिखट
  16. 1 टीस्पूनहळद
  17. 2हिरव्या मिरच्या
  18. 4वेलदोडे
  19. 1 टीस्पूनवेलची पावडर
  20. कोथिंबीर
  21. 2 टेबलस्पूनदही
  22. 4 टेबलस्पूनदूध
  23. केसर
  24. 10काजू
  25. 3 वाट्यापाणी अंदाजे तांदूळ शिजवण्या साठी
  26. 2 टेबलस्पूनमीठ चवीप्रमाणे
  27. 3/4 वाटीतेल
  28. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  29. 1 टेबलस्पूनतेल तांदूळ शिजताना टाकायचे

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्या साहित्याची तयारी करावी खालील चित्राप्रमाणे. बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे. आता सगळ्या भाज्या एका बाऊलमध्ये एकत्र करा आणि त्यामध्ये सर्व मसाले - लाल तिखट, हळद, लसूण पेस्ट, आले पेस्ट, शहाजिरे, वेलची पावडर, हिरवी मिरचीचे मध्ये कापून तुकडे टाका. त्यानंतर दही घाल, कोथिंबीर आणि मीठ घालून हे सर्व मिश्रण मिक्स करा.

  2. 2

    आता कढई मध्ये पाणी टाकून त्यामध्ये तमाल पत्रा, लवंग, चक्री फूल, मोठी वेलची आणि 1 टेबलस्पून मीठ घालून पाणी चांगले गरम करा. त्या मध्ये 1 टेबलस्पून तेल घाला. आता तांदूळ टाका आणि 80% शिजवुन घ्यावे.

  3. 3

    आता एका कढई मध्ये तेल घाला आणि गरम झाल्यावर कांदा घालावा आणि चांगला लाल परतून घ्यावा. आणि एका प्लेट मध्ये काढा.

  4. 4

    आता लाल झालेल्या कांदा मधले 1/4 वाटी कांदा बाजूला काढा. त्यानंतर कढई मध्ये थोडेसे उरलेले तेल घालून गरम करा आणि लाल परतलेला कांदा घाला. आता याच्यामध्ये मॅरीनेट केलेल्या भाज्या घाला, 2 टेबलस्पून पाणी घाला आणि चांगले 3-4 मिनिटे मोठ्या गॅस करून परतून घ्यावे म्हणजे भाज्या थोड्या शिजतात. आपल्याला इथे पूर्ण भाज्या शिजवायच्या नाहीत.

  5. 5

    आता आपला एकीकडे तांदूळ 80 % शिजला आहे. आता तांदूळ शिजलेला बाहेर काढा चाळणी मध्ये म्हणजे उरलेल्या पाणी गाळून घ्यायचे. त्यानंतर हा राईस त्या भाजीवर टाकावा चांगला पसरून. त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप सोडावे. तुम्ही तेलही घालू शकता. आपल्या आवडीनुसार. आता दुधामध्ये केशर घालून मिक्स करा आणि राईस वर पसरून घाला. त्यानंतर बाजूला ठेवलेला परतलेला कांदा घाला. आपले गाळलेले पाणी 3 टेबलस्पून राइसवर पसरून घालावे अंदाजे. आता झाकण बंद करून मध्यम गॅस करून 8- 10 मिनिटे शिजवून घ्यावे.

  6. 6

    आता झाकण काडून बघा की आपला राइस शिजला आणि भाज्या शिजल्या का. त्यानंतर गॅस बंद करावा. आता आपली व्हेजिटेबल बिर्याणी तयार झाली. प्लेट मध्ये गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes